Congress News : पंतप्रधान आज महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा दौऱ्यावर असताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित केली आहेत.
सातारा आणि सोलापूरमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी काय केले, 1750 कोटींचा सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्प इलेक्टोरल बाँड्सच्या बदल्यात खाजगी कंपनीला दिला गेला का ?, पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटनाच्या 2-3 वर्षातच का खराब झाला याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
जयराम रमेश म्हणतात, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे.मार्च व एप्रिल मध्ये सांगलीत 13 टक्के,साताऱ्यात 31 टक्के आणि सोलापूरमध्ये टँकरची मागणी 84 टक्के वाढली आहे. या परिसरातील धरणे, तलाव आणि नद्या या वेगाने कोरडे होत आहेत. ही खूप गंभीर बाब आहे. मागील 10 वर्षात भाजपचे 2 खासदार असलेल्या सोलापुरातील परिस्थिती तर खूप वाईट आहे.
शहराचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या उजनी धरणातील पाणीपुरवठा शून्याच्या खाली गेला आहे आणि शहरातील पुरवठा सध्या धरणातील “मृत साठ्या” वर टिकून आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की,सोलापूर महापालिकेला आता आवर्तन पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. शहरातील विविध भागात पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. 2014 आणि 2019 मध्ये सोलापूरच्या भाजप लोकसभा उमेदवारांनी निवडून आल्यास शहरातील पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु स्थानिकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या विजयानंतर ते सोलापुरात फारसे दिसले नाहीत. आणि पाणी टंचाई सोडवण्यासाठी त्यांनी कधीही काहीही पावले उचलली नाहीत.
पीएम मोदी आणि भाजपने दररोज गंभीर अशा पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हजारो लोकांच्या दुर्दशेकडे का दुर्लक्ष केले? परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडे काही ठोस योजना नाही का?
फेब्रुवारी 2024 मध्ये 1,500 मेगावॅट सोलापूर ट्रान्समिशन लाईन प्रकल्पाचे कंत्राट एका विशिष्ट खाजगी कंपनीला, सरकारी मालकीच्या पीएफसी कन्सल्टिंगने दिले होते. या प्रकल्पातून प्रती वर्ष 50 कोटी रुपये हे 35 वर्षांसाठी, एकूण रु. 1,750 कोटी. मात्र, हे फायदेशीर कंत्राट मिळालेल्या कंपनीने भाजपला मोठ्या प्रमाणात इलेक्टोरल बाँड्स दिले होते. जानेवारी 2024 मध्ये करार जिंकण्याच्या फक्त 1 महिना आधी. त्याने भाजपला 50 कोटी रुपये दिले. हे पंतप्रधानांचा ‘चंदा दो, धंदा लो’ संघटित लूट आणि भ्रष्टाचाराचा भाग आहे का?
Lok Sabha Election : अन् यामुळे वाढला सुधीर मुनगंटीवार यांचा स्कोअर !
बहुप्रतिक्षित पुणे-सातारा आणि सातारा-पंढरपूर महामार्ग उद्घाटन होऊन अवघ्या दोन ते तीन वर्षातच उखडला आहे. खडी वापरण्याऐवजी ठेकेदाराने रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी स्वस्त दगड आणि काळी माती वापरली, त्यामुळे रस्त्याला तडे गेले आणि काही ठिकाणी तर खड्डेही पडले आहेत. पुलाच्या स्लॅबवर 65 मिमी जाडीचा थर टाकणे आवश्यक होते परंतु केवळ 25 मिमी थर वापरण्यात आला.
शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसाठी द्यायचे असलेले क्रॉसिंगही बांधले गेले नाहीत. हे काँक्रीटचे रस्ते 40-50 वर्षे टिकतात .पण स्थानिक नेत्यांचे असे म्हणणे आहे कि अनुभव नसलेल्या कंत्राटदाराने लाच देऊन च हा प्रकल्प मिळवला आहे. अनेक टाळता येण्याजोग्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या या प्रश्नावर भाजपावाले गप्प का बसले आहेत? हे पण पंतप्रधानांच्या आवडत्या “चंदा दो धंदा लो” योजनेतील आणखी एक प्रकल्प आहे का? असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.