महाराष्ट्र

Buldhana : फुंडकरांना पालकमंत्री करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis : जिल्ह्यातील नेत्यासाठी गायकवाड आग्रही; संजय कुटेंची तक्रार

Mahayti : विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अटीतटीची लढाई झाली. त्यात संजय गायकवाड अवघ्या काही मतांनी विजयी ठरले. पण आपलं मताधिक्य कमी होण्यास महायुतीतलेच नेते कारणीभूत असल्याचा आरोप गायकवाडांनी केला होता. दरम्यान, आकाश फुंडकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गायकवाड पुन्हा चार्ज झाले आहेत. त्यांनी आता फुंडकरांना पालकमंत्री करा, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी डॉ. संजय कुटे यांच्याविरोधातील तलवार पुन्हा एकदा उगारलेली दिसत आहे.

‘माझ्याच पक्षातील प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून माझ्या विरुद्ध तुपकर यांच्याऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यास सांगितलं. भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली,’ असा दावा संजय गायकवाडांनी केला होता. आता डॉ. संजय कुटे यांना मंत्रिपदातून पत्ता कट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गायीकवाड यांनी आपण संजय कुटे यांची पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली होती, असा गौप्य्स्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले गायकवाड 

विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका गायकवाड यांनी संजय कुटे यांच्यावर ठेवून खळबळ उडवून दिली होती. आता नागपूर अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना डॉ. संजय कुटे आणि प्रतापराव जाधव यांची तक्रार केल्याचेही गायकवाड यांनी सांगितलं. एकीकडे डॉ. संजय कुटेंबद्दल गायकवाड यांनी राग व्यक्त केला असला तरी दुसऱ्याबाजुला मंत्रीपदाची संधी मिळालेल्या आकाश फुंडकरांबद्दल मात्र सॉफ्ट कॉर्नर दिसत आहे. गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बुलडाणा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मंत्रालय संधी द्यावी अशी मागणी करीत ना.अ‍ॅड.आकाश फुंडकर यांच्या नावाला पसंती दर्शवली. तशा आशयाचे पत्र आ.संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Nagpur winter session : बिनखात्याच्या मंत्र्यांवरच आटोपणार अधिवेशन!

काय आहे पत्रात?

अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांना जिल्ह्यातील सर्वच घडामोडी, अडचणी, समस्यांची जाण आहे. जिल्ह्यातील समस्यांना ते चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतात. बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यास संधी दिली असती केव्हा ध्वजारोहणाप्रसंगीत उपस्थित राहतात. जिल्ह्याच्या विकासाची गांभीर्य त्यांना नसल्याचे आजपर्यंत पाण्यात आला आहे. स्थानिक मंत्र्यांना मात्र जिल्ह्याच्या समस्यांबाबत वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते, तसेच स्थानिक असल्याने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी देखील त्यांच्यावर अधिक असते म्हणून ॲड.आकाश फुंडकर यांनाच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.

होय केली तक्रार

विधानसभेचे अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. यासाठी सर्वच आमदार नागपुरात पोहोचले आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे ते म्हणाले. गायकवाड पुढे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले. सात ते आठ लोकांची तक्रार केली. त्यात हे दोघेही आहेत, असे गायकवाड म्हणाले. मीच नाही तर मेहकर आणि सिंदखेडराजाच्या आमच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी देखील तक्रार केल्याचा गौप्यस्फोट करून संजय गायकवाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.

काठावरचा विजय गायकवाडांच्या जिव्हारी

अगदी काठावरचा विजय गायकवाडांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यांनी कमी मताधिक्यासाठी शिवसेनेतल्याच नेत्यांना जबाबदार धरलं. आता या सगळ्या प्रकारासंदर्भात आमदार गायकवाड पक्षाकडे लेखी तक्रार केली. शिवसेनेतेले फायरब्रँड नेते म्हणून संजय गायकवाडांची ओळख आहे. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंचे ते अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!