महाराष्ट्र

Gondia News : रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामावरून आमदार.अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

Railway Over Bridge : आंदोलन करण्याचा दिला इशारा

Gondia Rob : रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडत नसल्याने भाजप समर्थित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. 8 दिवसात काम सुरु न केल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही अग्रवाल यांनी दिला आहे.आमदाराच्या इशाऱ्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गोंदियावासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.आमदार विनोद अग्रवाल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने या पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली होती. आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले. तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आले होते. तरीही कंत्राटदार व संबंधित विभागाला काम सुरु करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही.

त्यामुळे नागरिकांनी परत आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. एवढे परिश्रम आणि विविध परवानग्या मिळवून कामाला मंजुरी मिळवून देण्यात आली. तरीही अद्याप काम सुरु न झाल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव अधिकाऱ्यांना नाही, असेही आमदार अग्रवाल यांनी सुनावले.

काही दिवसात पावसाळा सुरु झाला म्हणून काम बंद केले जाईल. यापेक्षा किमान काम सुरु झाले असते तर अद्याप दोन्ही बाजूने पुलाचे बांधकाम झाले असते. परंतु असे न करता काम सुरु सुद्धा झाले नाही. यामुळे आमदार विनोद अग्रवाल संतापले आहेत.

Education News  : ताई तुमचा मुलगा किती वर्षाचा हो!

अन्यथा करणार आंदोलन !

कामात जी दिरंगाई झाली ती झाली. परंतु जर कामाला 8 दिवसाच्या आत सुरुवात झाली नाही तर आंदोलनाची भूमिका घेतली जाईल. साखळी उपोषणाच्या माध्यमाने सुरुवात करून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी दिला. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज पडू देवू नका असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

error: Content is protected !!