अकोला, लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. महायुतीतील नाराजी नाट्य आता चव्हाट्यावर येत आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मासिकातून थेट अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. दरम्यान आता अजित पवारांच्या नेत्यांकडूनही भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत मोठं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडिला चांगलं यश मिळाल. त्यामुळे महायुतीत आता नेत्यांमध्ये नाराजी नाट्य यासह निकालावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्यात महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. तर भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना टार्गेट करण्यात आले होते.
अजित पवार यांच्यामुळे पराभव
भाजपच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला, अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,’ अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट करीत थेट इशाराच दिला आहे.
राज्यात महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या पराभवाला अजित पवार यांना कारणीभूत ठरविण्यात येत असून भाजपचे काही नेते खासगीत बोलत असल्याचे समजते. विशेष म्हणजे अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावे लागले आहे. तर, मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.
त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा एकोपा नसल्याचे समोर आले. त्यानंतर, निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही. याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवारांसमवेत न राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे, अजित पवार महायुतीच्या पराभवाचे खलनायक ठरवले जात आहेत. त्यावरुन, आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे.
मिटकरींचा इशारा आणि पुढे काय!
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार हे आपला गट घेऊन भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री पदासह मंत्रीपदे राष्ट्रवादीला मिळाली. मात्र त्यानंतर राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकाला नंतर अजित पवार यांना सातत्याने टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांचे सर्मथक आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा दिला आहे. दरम्यान आता या इशाऱ्यानंतर नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणे औसुक्याच ठरणार आहे