Mahayuti Meeting : ‘मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे. गरीब मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं शक्य आहे का? त्यामुळे तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता’.तशी संधी उपलब्ध आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे सुतोवाच केले. महायुतीचे राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी झालेल्या सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले, तुम्ही काँग्रेसचा 60 वर्षांचा कार्यकाळ पाहिला. माझी 10 वर्ष पाहिली आहेत. मागच्या 10 वर्षात सामाजिक न्यायासाठी जितकं काम झालं, तितकं स्वातंत्र्यानंतर कधीही झालं नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
Lok Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार
आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे. कारण यापुढे मला बरच काही द्यायचं आहे. मला धन, दौलत नको. मला यश, किर्ती नको. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, असं मोदी म्हणाले.
नकली शिवसेनावाले म्हणतात, आमच्याकडे पंतप्रधानपदाचे अनेक नेते आहेत परंतु एकमत होत नाही. यांना सत्ता प्राप्त करून केवळ मलिदा लाटायचा आहे. अशा शब्दांत त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
आम्ही सामाजिक न्यायाला प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी दहा वर्षाच्या कार्यकाळात योजना राबविल्या. देशातील आदिवासी, ओबीसी तसेच विविध घटकांना न्याय दिला. आणि पुढच्या काळात देखील विकासाची दिशा कायम राहील. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. सोलापूरच्या सभेला या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.