महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गरिबांना हक्काचं घर

Ballarpur Assembly Constituency : 961 लाभार्थ्यांसाठी 12 कोटी 49 लाख 30 हजार रुपये मंजूर

Benefits To Needful : बल्लारपूर मतदासंघांतील लोकांना आता हक्काचे घरकूल मिळणार आह. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आता अनेकांचं हक्काच्या घराचं सुंदर स्वप्न साकार होणार आहे. गरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत हा लाभ बल्लारपूर विधानसभेतील गरिबांना मिळणार आह. त्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे .

या योजनेअंतर्गत पोंभूर्णा येथील 500, मुल येथील 376 आणि चंद्रपूर येथील 85 नागरिकांनी हक्काचं घर मिळणार आहे. आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आह. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सुधीर मुनगंटीवार यांनी घरकूल योजनेच्या निधीकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत बल्लारपूर विधानसभा मतदासंघातील 961 लाभार्थ्यांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठा निधी

घरकूल उभारणीसाठी 12 कोटी 49 लाख 30 हजार रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात करण्यात आला. बल्लारपूर विधानसभा मतदरसंघातील मुल, पोंभूर्णा चंद्रपूर तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, घरकुल योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. वर्ष 2024-25 करीता 961 वैयक्तिक घरकूल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता मिळाली आहे. लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी 1 लाख 30 हजार रुपये याप्रमाणे रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, आणि पोंभूर्णा तालुक्यातील 961 लाभार्थ्यांना यशवतंराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलचा लाभ होणार आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आह. यात चेक हत्तीबोडीमध्ये 60 लाभार्थी आहेत. घाटकुळमध्ये 106 जणांना लाभ मिळेल. सातारा भोसले येथे 11 जण लाभार्थी आहेत l. जामतुकूम येथे 55 तर चेक आंबेधानोरा येथे 22 लोकांना हक्काच्या घराचा लाभ प्राप्त होत आहे.मोहाळा रै 26, जुनगाव 42, बोर्डा झुल्लुरवार 12, बोर्डा बोरकर 127, चिंतलधाबा 16, नवेगाव मोरे 16 आणि फुटाणा मो येथे सात लाभार्थी संख्या आहे.

Oxygen Bird Park : गडकरींवर जबाबदारी पक्षाची अन् पक्ष्यांची!

मूल तालुक्यातही लाभार्थी

मूल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहेत. यात चिमठा गावातील येथे 27, विरई येथे 33, गवराळा येथे 28, उश्राळा येथे 17 लाभार्थी आहेत. चिरोलीत 42, डोंगरगावात 115, सुशीमध्ये 99 आणि राजगड येथील 13 लाभार्थ्यांना घरकुलाची भेट मिळाली आहे. चंद्रपूर तालुक्यातील लाभार्थी संख्या 85 आहे. यात अजयपूर येथील एक, चिचपल्लीमधील 21, मामला येथील 11, चोरगावातील तीन, जुनोना येथील 12, नागाळा येथील तीन लाभार्थ्यांचा समावेश आहे. निंबाळामध्ये नऊ, पिंपळखुटा, चेक पिंपळखुट येथील प्रत्येकी एक लाभार्थी आहे. पिपरी पाच, मोहर्लीत दोन वरवटमध्ये 12 आणि सिदूर येथील चार लाभार्थ्यांचाही समावेश आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!