महाराष्ट्र

NCP : विजयाचा गुलाल आमचाच राहिल; निवडून सुप्रिया ताईच येईल

Baramati : समर्थकांना विजयाचा विश्वास, पुण्यात लागले बॅनर

Lok Sabha Election : देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील पाचव्या टप्प्याची निवडणूक येत्या 20 मे रोजी होणार. 20 मे रोजी देशातील एकूण 49 जागांवर मतदान होणार आहे. त्यातील महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. पण त्यापूर्वीच भोर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत

गुलाल आपलाच.. अतिउत्साही कार्यकर्त्याचा दावा

बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार लढत सुरू होती. तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात सुन विरूद्ध भावजळ अशी लढत झाली.पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकालाच्या आधीच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे. शिउबाठाचे भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन, गुलाल आपलाच..कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय अशा आशयाचा फलक महामार्गावर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणूआधी लागलेल्या या फलकाने लक्ष वेधून घेतले आहे.

Birsi Issue : ‘टेकऑफ’साठी पटेलांचा ‘सुपर रनवे’; पण त्यांचे काय?

मतदानादिवशीही अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जात चर्चेचा उधाण दिले. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. निकालात जर पक्ष हरला तर या नाट्याचा सुध्दा पोपट नक्कीच.

error: Content is protected !!