Raver constituency : जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघात होम व्होटिंग अंतर्गत आरोग्य विभागाने पात्र ठरवलेल्या 1504 जणांपैकी 731 लोकांनी आज मतदान केले. काल 52 जणांनी असे एकूण 783 मतदारांनी दोन दिवसात मतदान केले. उर्वरित मतदान येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेनी दिली.
103 वर्षाच्या आजोबांनी केले मतदान
चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ( खुर्द ) या गावातील 103 वर्षाचे धोडगीर शंकर गोसावी यांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेने मतदान करवून घेतले. गोसावी यांचा जन्म 1921 चा आहे. भारताच्या पहिल्या निवडणुकी पासून ते साक्षीदार असल्यामुळे त्यांचा मतदार म्हणून मत करतानाचा फोटो स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो.
काल जळगाव लोकसभा निवडणुकीचे निरीक्षक राहुल गुप्ता यांनी जळगाव मधील होम सुविधा उपलब्ध असलेल्या पहिल्या ज्येष्ठांना प्रमाणपत्र दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घरी जाऊन ज्येष्ठांच्या ‘ होम वोट सुविधेची पाहणी केली. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ‘ होम वोटिंग सुविधा ‘ उपलब्ध करून दिली. संध्याकाळ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार तालुकानिहाय खालील प्रमाणे होम वोटिंग झाले. यामध्ये रावेर-100, मुक्ताईनगर-106, भुसावळ-107, जळगाव शहर-107, जामनेर-84, चाळीसगाव 76, जळगाव (ग्रामीण)-108, एरंडोल – 116 आणि चोपडा-43 यांचा समावेश आहे.
Maharashtra Lok Sabha Election : शांतीगिरी महाराजांनी आशीर्वाद द्यावा
काय आहे ‘होम वोटिंग’ ?
केंद्रीय निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय केली आहे.जळगाव जिल्ह्यात त्याला सोमवारपासून सुरूवात झाली. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा हा उद्देश आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे.