प्रशासन

IPS Transfer : माकणीकर, सागर, हसन, जैन, पानसरे, चिंता, बनसोड यांची बदली

Home Department : निवडणुकीपुर्वी पोलिस विभागात फेरबदल

Assembly Election : लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील पोलिस आणि सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 13) गृह विभागाने पोलिस दलात मोठे फेरबदल केले. आयपीएस दर्जाच्या 28 अधिकाऱ्यांचे बदली आदेश गृह विभागाने काढले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये विदर्भातील अनेकांचा समावेश आहे. नागपूर मंगळवारी गृह विभागाने बदलीसंदर्भातील दोन आदेश काढले. पहिल्या यादीत राज्य पोलिस सेवेतील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत आयपीएस दर्जाच्या 17 अधिकाऱ्यांची नावे आहेत.

नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी तथा उपायुक्त अनुराग जैन यांना वर्धा येथे पोलिस अधीक्षक पदावर पाठविण्यात आले आहे. नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) पोलिस अधीक्षक विश्व पानसरे हे बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक असतील. बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने हे सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पानसरे हे त्यांची जागा घेतील. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता हे यवतमाळचे नवे पोलिस अधीक्षक असतील.

आणखी अधिकाऱ्यांचा समावेश

यवतमाळाचे विद्यमान पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांनी बदली अमरावतीच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. वर्धाचे पोलिस अधीक्षक नुरूल हसन हे नवी मुंबईतील राज्य राखील पोलिस बल गटाचे (SRPF) समादेशक असतील. नागपूर आणि वर्धेत कारकीर्द गाजविणारे हसन यांची ही ‘साइड पोस्टिंग’ असेल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान यांना नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंकध विभागात पोलिस अधीक्षक पदावर नेमणूक देण्यात आली आहे.

IAS, IPS Transfer : मिनी पालकमंत्र्यांची नाराजी; कुंभेजकर, मतानींच्या बदलीचे संकेत

महाराष्ट्र राज्य पोलिस सेवा श्रेणीतील अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्याही बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंकध विभागात पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांना पुन्हा एकदा नागपूर शहर पोलिस दलात उपायुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. माकणीकर यांनी यापूर्वीही नागपूर शहरात उपायुक्त पदावर काम केले आहे. नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील हे मुंबईत सायबर सुरक्षा विभागाचे नवे एसपी असतील. नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत उपायुक्त विजयकांत सागर यांची बदली बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्त पदावर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियमानुसार कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येते. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडूनही विचारणा केली जाते. त्यापूर्वीच राज्य सरकारने आयपीएस आणि आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यातील अनेक विभागांमध्ये हे बदली सत्र सुरू आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!