Manipur Violence : अनेक महिन्यांपासून मणिपूरमधील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं मौन सोडलं आहे. मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केले आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं. तर आता गृहमंत्री अमित शाह ऍक्शन मोड वर आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 17 जूनला सोमवारी संध्याकाळी मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी यांच्यासह मणिपूरचे मुख्य सचिव, मणिपूर डीजीपी, तसेच लष्कर आणि इतर सुरक्षा दलांचे अधिकारी यांचाही समावेश होता.
ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचर अजूनही थांबलेला नाही. केंद्र सरकार आता या मुद्द्यावर ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याआधी गृहमंत्र्यांनी 17 जूनला मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेतली होती. हिंसाचार संपविण्यासाठी या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
मणिपूरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्रालयात काल महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, पुढील लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह, माजी सीआरपीएफ प्रमुख आणि मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीत मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याबाबत चर्चा झाली. एनसीआरबीचे डीजी विवेक गोगिया हेदेखील गृह मंत्रालयात उपस्थित होते.
मोदींनी प्रथमच केला होता मणिपूर चा उल्लेख
नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी मणिपूरच्या हिंसेबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, “माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे त्याच्या जागेवर आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे. 140 कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.