महाराष्ट्र

Lok Sabha Election : तप्त उन्हाचा मतदानावर होणार परिणाम? 

Buldhana Constituency : प्रशासन उपाय योजना करणार

Buldhana constituency : सध्या देशात लोकसभा निवडणूक होत आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षातील सर्वात उष्ण दिवसांमध्ये हे मतदान होणार आहे. विदर्भात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून मतदानाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात होण्याआधी राज्यामध्ये उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसतो आहे. त्यात बुलढाणा जिल्हा हा सर्वाधिक तापतो यामुळे उष्णतेच्या लाटेचा परिणाम मतदानावर होणार का असे बोलले जात आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एप्रिल ते जून दरम्यान देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. याच काळात देशभरात निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे यंदा निवडणुकांना तापमान वाढीचा फटका बसू शकतो. हवामान विभागाने एप्रिल, मे, आणि जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. “एप्रिल २०२४ मध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे,” अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या तापमान वाढीचा परिणाम मतदानावर होण्याची चिन्हे असून या परिस्थितीत देशातील लोकसभा निवडणुकांसमोर उष्णतेची लाट आणि हवामान बदलाचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे एप्रिल महिन्यात असणार आहेत. त्यात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. मतदारसंघांसाठी मतदान होणार असलं तरी प्रचारसभा, कार्यक्रम आणि निवडणूक प्रचाराशी निगडीत विविध गोष्टी जोरात सुरु झाल्या आहेत. असह्य उष्णता आणि तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये राजकीय पक्ष, राजकीय नेते, प्रशासन आणि निवडणूक आयोगाची देखील परीक्षा असणार आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी 2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं होतं. याठिकाणी यंदा 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची टक्केवारी 63.53 टक्के होती. तर 2014 साली 55.39 एवढे मतदान झाले होते. 2019 मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 58 हजार 943 मतदार होते. त्यापैकी 11 लाख 17 हजार 486 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 2014 मध्ये एकूण 9 लाख 78 हजार 626 मतदारांनी हक्क बजावला होता. आता उन्हाचा तडका वाढणार असल्याने 50 ते 55 टक्के मतदान पार पडेल असे विश्लेषकांचे मत आहे.

Lok Sabha Election : शेगावच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना ऐनवेळी ‘प्लान चेंज’

प्रशासन काय म्हणतं

तप्त उन लक्षात घेता मतदान केंद्राच्या ठिकाणी शेड, पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती पाहता उपाय पुरेशे ठरतील का ही चर्चा होते आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!