Gondia news : एक लाखाची लाच मागण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत विभागाने जिल्ह्यातील गोरेगावचे तहसीलदार भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे व संगणक चालक गणवीर या तिघांविरूध्द 7 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपींना 11 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे तिन्ही आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र 13 मे रोजी जामीन अर्जावर गोंदिया न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे लाचखोर तहसीलदाराला जामीन की पुन्हा कोठड़ी हे आज कळणार आहे.
गोरेगाव तहसील कार्यालयात 7 मे रोजी लाचलुचपत विभागाने तहसीलदार, नायब तहसीलदार व कम्प्युटर ऑपरेटर या तिघांना लाच मागण्याच्या आरोपाखाली कारवाईसाठी सापळा रचला. मात्र,आरोपींनी थेट लाच स्वीकारली नाही. परिणामी लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी तहसीलदार किसन भदाने, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर नागपुरे व कम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र गणवीर या तिघांविरूध्द गोरेगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली होती. 13 मे रोजीच्या सुनावणी कडे लक्ष लागले आहे. न्यायालय आरोपींना जामीन मंजूर करते की पुन्हा कोठडी सुनावते याकडेही लक्ष आहे.