महाराष्ट्र

Amol Mitkari : हल्ल्यानंतर आईची प्रकृती बिघडली

MNS Vs NCP : अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा रद्द

Tension In Akola : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात राड्याला सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे जय मालोकार या मनसे पदाधिकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. अशातच बुधवारी (ता. 31) आमदार अमोल मिटकरी यांच्या आईचीही प्रकृती खालावली. आमदार मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अकोल्यात मोर्चा काढणार होती. मात्र त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याचे नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आला आहे.

 मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मंगळवारी घडलेल्या एकूण प्रकारानंतर मिटकरी यांच्या आईची प्रकृती खालावली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केला त्यावेळी चांगलीच झटपाट झाली. यात मनसेचे विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष जय मालोकार यांना हृदयविकाराचा झटका आला. केअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अकोल्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. 

जय सुदृढ होता

जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी आता मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. जयला कोणताही त्रास नव्हता. जय सुदृढ होता. झटापटीत त्याला मारहाण झाली. त्यामुळे त्याला हार्टअटॅक आला. याप्ररकणाची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी जयचे भाऊ विजय मालोकार यांनी केली. बुधवारी जयच्या पार्थिवावर निंबी मालोकार येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अशातच मिटकरी यांच्या आईची प्रकृतीही खालावली. त्यामुळे मिटकरी पूर्णवेळ आईसोबत होते, असे सांगण्यात आले.

Vikas Thakre : नागपूरसाठी निधी येतो तर जातो कुठे?

मिटकरी यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरील टीका थांबवलेली नाही. त्यामुळे आता मनसेने त्यांना अल्टीमेटम दिला आहे. राज्यभरात मनसैनिक आहेत. त्यामुळे आता राज्यात फिरू देणार नाही, असा सज्जड दम मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी भरला आहे. त्यामुळे मिटकरी यांचा परिवारही सहाजिकच चिंतेत असेल. घराभोवती पोलिसांचा वेढा असला तरी कोणत्या क्षणी काय होईल, याचा नेम नसल्याने मिटकरी कुटुंबही सध्या चिंतेत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडलेले आहे. दुसरीकडे मनसैनिकही आक्रमक आहेत. जयच्या मृत्युनंतर तर या घटनेला वेगळेच वळण लागले आहे. तूर्तास अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस (Akola Police) दोन्ही गटातील लोकांवर वॉच ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अशात मनसेचे युवा नेते आदित्य ठाकरेही अकोल्यात येत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!