महाराष्ट्र

DCM of Maharashtra : ‘डीसीएम’च्या हस्ते ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’चे प्रकाशन

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा

Dedicated to Common Man : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर यावे लागले, याचे दुःख वाटते का, या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी खास उत्तर दिलं होतं. ‘मी आधी सीएम होतो म्हणजे कॉमन मॅन होतो. आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे,’ असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखी मांडणाऱ्या ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ या पुस्तकाचे त्यांच्याच हस्ते प्रकाशन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात त्याची चर्चा होत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारिकिर्दीचा लेखाजोखा मांडणाऱ्या पुस्तकात नेमकं काय लिहिलं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही संपूर्ण राज्याला लागली आहे. जवळपास सव्वा दोन वर्ष एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. या पदावर असताना त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ या कॉफी टेबल बुकमध्ये मांडण्यात आला आहे. नागपूर विधान भवन येथे अलीकडेच हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाच्या सुबक आणि सुटसुटीत मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले.

महायुतीला रेकॉर्ड ब्रेक यश

यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले, संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे प्रवक्ते व युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी राहुल लोंढे , पत्रकार प्रवीण काळे आदींची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले लोकप्रिय निर्णय, या निर्णयांचा राज्यातील जनतेवर झालेला सकारात्मक परिणाम याचा सारांश पुस्तकात मांडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला रेकॉर्ड ब्रेक यश मिळविण्यात आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आदी घटक पक्षांची पुन्हा प्रचंड बहुमताची सत्ता येण्यात शिंदे यांच्या कामगिरीचा कसा वाटा आहे, हे देखील यात मांडण्यात आलं आहे.

Nitin Gadkari : विमानतळाच्या नवीन धावपट्टीवरून संतापले गडकरी

योजना

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बळीराजा कृषी पंप विज बिल सवलत योजना, टोलमाफीचा मास्टर स्ट्रोक आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ या छोटेखानी कॉफी टेबल बुकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेखही मांडण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर, विधिमंडळातील ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांचे या उपक्रमामध्ये योगदान आहे. पुस्तकाची संकल्पना, निर्मिती आणि संपादन जेष्ठ पत्रकार सुनील जावडेकर यांचे आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!