महाराष्ट्र

Assembly Elections : हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रावर प्रभाव पडेल?

BJP Wins : हरियाणात तिसऱ्यांदा कमळ फुलले; राज्यभर भाजपचा जल्लोष

हरियाणा विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा भाजपने सत्ता राखण्यास यश मिळविले आहे. 48 जागा जिंकून भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागेल आहे. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. त्यामुळे हरियाणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता हरियाणात भाजपने मिळविलेल्या विजयाचा प्रभाव महाराष्ट्रात पडू शकेल का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं. याशिवाय अनेक एक्झिट पोलहीही काँग्रेसच्या बाजुने जनमत झुकले असल्याचा दावा करीत होते. प्रत्यक्ष निकाल आल्यावर मात्र सगळे अंदाज चुकीचे ठरले आहेत. महाविकास आघाडीच्या बाजुने महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभेत कौल दिला होता. असेच विधानसभेत घडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, हरियाणानंतर महाराष्ट्रातही हा अंदाज खोटा ठरू शकतो, असे आता राजकीय तज्ज्ञ म्हणू लागले आहेत.

हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे. त्यामुळे अकोल्यासह संपूर्ण राज्यात जल्लोष केला जात आहे. या विजयामुळे राज्यातील भाजपचं मनोबल वाढलं आहे. महाराष्ट्रात लवकरच आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. हरियाणा विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. हरियाणात भाजपने विजयाची हॅट्ट्रिक मारली आहे.

शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळविले आहे. गेली 10 वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती. अशा स्थितीत अँटी इन्कम्बन्सीसह अनेक बाबी समोर आल्याने भाजपचे नुकसान होताना दिसत होते. पण भाजपने हरियाणा निवडणुकीच्या 7 महिने आधी अशी खेळी केली, ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली.

जम्मू काश्मीरचा निकालही जाहीर झाला आहे. जम्मू काश्मीर मध्येही मागील 2019 च्या तुलनेत एक जागा अधिक मिळवून भाजपने 29 चा आकडा गाठला आहे. दोन्ही राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर अकोल्यातही भाजप तर्फे पक्ष कार्यालयाजवळ विजयाचा जल्लोष करण्यात आला.

Assembly Election : राहुलसोबत प्रियंकाही उतरणार महाराष्ट्राच्या मैदानात

फेक नरेटिव्हला उत्तर मिळालं

हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं अकोल्यासह राज्यभरात भाजपकडून जोरदार जल्लोष सुरू आहे. हरियाणातल्या विजयामुळे राज्यातील भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलं., असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झाली आहे. दरम्यान या विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे.

ढोलताशाचा गजर

अकोल्यातील भाजप कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर एकमेकांना पेढे भरवत हरियाणा येथील विजयाचा भाजपकडून जल्लोष करण्यात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!