महाराष्ट्र

Eknath Shinde : अडीच कोटी घरांवर फडकणार तिरंगा

Mumbai : मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास; ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा शुभारंभ

केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा शुभारंभ दि. 9 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील क्रांती मैदानावर झाला. यावेळी त्यांनी राज्यातील अडिच कोटी घरांवर तिरंगा फडकणार असल्याचे सांगितले. भारत छोडो आंदोलनाच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

केंद्राचा ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ही एक लोक चळवळ बनली आहे. आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना जागृत करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘राज्यातील अडीच कोटी घरे, कार्यालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल. 9 ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील,’ असे त्यांनी सांगितले .

यां मोहिमेद्वारे देशप्रेमाची भावना जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार. आपल्या राष्ट्रध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार असल्याचे त्यांनी संबोधन केले.

महत्त्वाचा टप्पा 

राज्यभरात तिरंगा मार्च, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नागरिकांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्याची शपथ मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच विद्यार्थी व तरुणांनी सायकलॅथॉन व पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवली. ही चळवळ ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच भूमीवर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मरा’चा नारा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाउंट्सवर आपला डीपी बदलला आहे. पंतप्रधानांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवर राष्ट्रध्वज लावून मोहीम सुरू केली. हे अनुकरणीय आहे, असे ते म्हणाले. 77 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी त्यांनी देशातील नागरिकांना एक खास संदेशही दिला आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व नागरिकांना त्यांच्या डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

मोहीम संस्मरणीय 

प्रत्येक घराघरात तिरंगा एक संस्मरणीय जनआंदोलन बनला. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम संस्मरणीय बनवायला हवी. मी माझा डीपी बदलत आहे. तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही तुमचा डीपी बदला आणि माझ्या या विशेष मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!