महाराष्ट्र

Assembly Election : संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध सुजय विखे?

Sujay Vikhe : अखेर अकोला दौऱ्यावर पालकमंत्री

Akola : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘त्यांना 35 वर्षे सत्ता दिली. मला 5 वर्षे सत्ता देऊन पहा,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर 22 सप्टेंबर रोजी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात जर सुजय विखे यांना संगमनेर मधून तिकीट मिळल्यास या मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना रंगणार आहे.

निवडणुकीसाठी कंबर कसली

विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांनी मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बैठकींचा धडाका लावला आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याबाबत नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहे. अशात नगरचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी विधानसभेत जाण्याची तयारी सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणुक ही संगमनेर मधून आपल्याला पक्षाने संधी दिल्यास संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल, असं मोठं विधान केलं होतं. त्यांना 35 वर्षे सत्ता दिली. मला 5 वर्षे सत्ता देऊन पहा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे हे थेट आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे. अशात आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्षा जो निर्णय घेईल तो मान्य असेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Ramdas Athawale : प्रकाश आंबेडकरांनाही दिली खास ऑफर

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले!

डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते 22 सप्टेंबर रोजी अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘अद्यापही पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली नाही. सुजय विखे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, पक्षाने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाहीत. मात्र पक्षाकडून जो निर्णय होईल तो मान्य राहील.’ तर सुजय विखे हे राजकीय आणि सामाजिक काम करतात. माझा मुलगा म्हणून तर त्यांनी जिल्ह्यात खासदार म्हणून काम केलेले आहे. शेवटी पक्षाने म्हटलं तर निवडणूक लढवतील, असंही विखे पाटील म्हणाले.

एकंदरीतच लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नगर जिल्ह्यातील मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!