प्रशासन

Gadchiroli Administration : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभांचा सत्कार

IAS Sanjay Daine : ग्रामीण भागातील कार्य सक्षमपणे व्हावे

Forest Development : जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने गडचिरोलीत ग्रामसभा सक्षमीकरणााचे कार्य सुरू आहे. लोकसहभागातून हे काम केले जात आहे. ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभा, सहयोगी मित्र, केंद्र समन्वयक, मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी (Collector) कार्यालय येथे करण्यात आला. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मानव विकास मिशन अंतर्गंत ग्रामसभांना गोडाऊन बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेतून प्रति ग्रामसभा नऊ लाख रुपयांचे खेळते भांडवल देण्यात येत आहे. आतापर्यंत 13 ग्रामसभांना 1 कोटी 17 लाख रुपयाचे सामूहिक धनादेश मंजूर झाले आहेत. या धनादेशांचे (Cheque) वितरण या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. संपूर्ण भारतात सर्वप्रथम सामूहिक वनहक्क प्राप्त करणारा जिल्हा गडचिरोली ठरला. सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणूनही गडचिरोलीची ओळख आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियमानुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार109 ग्रामसभांना सामूहिक वनहक्क दावे प्राप्त आहेत.

कायद्याची अंमलबजावणी

कायद्याच्या अनुषंगाने सामूहिक वनहक्क क्षेत्राचे कामकाज पाहण्यासाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (Collective Forest Rights Management Committee) स्थापन करण्यात आली आहे. एकल लोकसहभागातून ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामसभांना सामूहिक वनहक्क क्षेत्रात जंगल संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कामे मिळत आहे. मानव विकासअंतर्गत गोडाऊन बांधकाम, नरेगा एजन्सी, ऑनलाइन नरेगा पोर्टलवर नोंदणी अशा माध्यमातून सामूहिक वनहक्क क्षेत्रात घेण्यात येणारी, कामेही केली आहेत.

Praful Patel : महायुती ठरली वचन पाळणारी 

ग्रामसभांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगी मित्र, ग्रामसभा व मार्गदर्शकांची जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठाकडून (Gondwana University) पाठ थोपटण्यात आली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभांचे व सहयोगी मित्रांचे कौतुक केले. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘एकल’चे नोडल अधिकारी चेतना लाटकर, कृषितज्ज्ञ मंगेश भानरकर, एकल कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नरेश मडावी, सहसमन्वयक डॉ. नंदकिशोर मने, एकल सेंटर समन्वयक चंद्रकांत किचक, सूरज चौधरी व नीलेश देसाई आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी ग्रामसभांच्या कार्याचे कौतुक केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!