Shiv Sena News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. जाधव यांनी शपथ घेताच बुलढाणा दिवळी साजरी करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतंषबाजी केली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हा जल्लोष केला. गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयापुढे दिवाळीच साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या नेतृत्वात आतंषबाजी करण्यात आली. आनंद व्यक्त करण्यात आला..
बुलढाणा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले. एकमेकांना पेढे भरविण्यात आलेत. प्रतापरावांनी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला. जाधव यांचे गृहशहर असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातही फटाक्यांचा आवाज जोरदार होता.
PM Oath Ceremony : काहींनी केले अभिवादन, काहींनी गडकरींना टाळले
पुन्हा राजयोग
खासदार जाधव यांच्या रूपाने बुलढाण्याला पुन्हा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच केंद्राचा लालदिवा मिळाला होता. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मुकुल वासनिक यांना क्रीडा युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले होते. मूळचे नागपूरकर असलेले वासनिक यांनी 1984 मध्ये बुलढाण्यातून निवडणूक लढवत खासदारकी मिळविली. 1989 मधील लढतीत त्यांचा दारुण पराभव झाला. 1991 मध्ये पुन्हा त्यांनी बाजी मारली. त्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले.
2009 मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी झाला. त्यानंतर त्यांनी रामटेक मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 1996 मधील लढतीत वासनिकांचा पराभव झाला. त्यात कामगार नेते आनंदराव अडसूळ हे प्रथमतः बुलढाण्याचे खासदार झालेत.
1998 मध्ये पराभूत झाल्यावर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळविला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात अडसूळ अर्थ व नियोजन खात्याचे राज्यमंत्री होते. पदाची जवाबदारी सोपविण्यात आली होती. आता प्रतापराव जाधव यांच्या रुपाने बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा राजयोग प्राप्ती झाली आहे.