प्रशासन

Tumsar Politics : प्रमाणपत्राने तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य अडचणीत

Cast Reservation : राखीव प्रवर्गातून निवडून आल्यानंतरही दाखविली नाही ‘जात वैधता’

Gram Panchayat : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातील सदस्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. नियमानुसार निवडून आल्यावर ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र मुदत संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही काही सदस्यांकडून अद्याप प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार राहू शकते. 

सन 2022 मध्ये तुमसर तालुक्यात 78 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. राखीव प्रवर्गातून निवडून आल्यानंतर ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश

उमेदवारांना तुमसर तहसीलदारांनी दिले होते. तहसीलदारांनी सर्व सचिवांमार्फत संबंधित सदस्यांना 15 दिवसांपूर्वी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. राखीव प्रवर्गातून नामनिर्देशनपत्र भरून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक असते. तसे न केल्यास अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तहसीलदारांनी दिला होता.

अनेक अडचणीत

तुमसर तालुक्यात 2021 मध्ये 18 ग्रामपंचायतींची निवडूक झाली. 2022 मध्ये 78 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाली. यात राखीव प्रवर्गातून अनेक उमेदवार निवडून आले आहेत. प्रशासनाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या कालावधी संपला आहे. 2022 मध्ये झालेल्या 78 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 262 उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यापैकी 234 उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागात जमा केले आहे. 28 उमेदवार अद्यापही प्रमाणपत्र न देणाऱ्यांच्या यादीत आहेत.

Inquiry Committee : राज्यात बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट?

2021 मध्ये झालेल्या 18 ग्रामपंचायतींमधून 5 उमेदवारांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने हे सदस्य अडचणीत येऊ शकतात. प्रमाणपत्र सादर करयाची मुदत संपण्याचा कालावधी जवळ येत आहे. अशात आता उर्वरित सदस्य कधी जात वैधता प्रमाणपत्र सादर करतात? यावर सगळ्यांचे लक्ष आहे. उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास ते अपात्र तर होतीलच, याशिवाय त्यांचे विरोधक त्यांना कायद्याचा आधार घेत घेरतील असेही दिसत आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही उमेदवार प्रमाणपत्र का सादर करीत नाही? याची चर्चाही गावांमध्ये सुरू झाली आहे. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविताना असलेल्या निकषांपैकी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे दोन सगळ्यात महत्वाचे निकष आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!