महाराष्ट्र

Cabinet Expansion : राज्यपाल म्हणाले, ‘वुई कांट वेस्ट टाइम’

Oath Ceremony : दोन मंत्र्यांच्या शपथेमधील वेळेची बचत 

Raj Bhavan Nagpur : सुमारे 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूर मध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभावनात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीला सुरुवात झाल्यानंतर काही क्षण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रतीक्षा केली. त्यावेळी दोन मंत्र्यांना शपथ देताना वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

अशा पद्धतीने शपथविधीची प्रक्रिया पार पाडली तर या सोहळ्यासाठी बराच वेळ लागेल, हे राज्यपालांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना वेळेची बचत करण्याची सूचना केली. मंत्र्यांने शपथ घेतल्यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी काहीसा वेळ लागतो. त्यानंतर नवनियुक्त मंत्री राज्यपाल आणि इतर मंत्र्यांची भेट घेतात. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ‘वुई कांड वेस्ट टाइम’ असे म्हणत राधाकृष्णन यांनी लवकर लवकर प्रक्रिया करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

वेगाने शपथ

राज्यपालांनी दिलेल्या सूचनेनंतर मंत्र्यांच्या नावाची घोषणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेग धरला. एक मंत्री शपथ घेतल्यानंतर रजिस्टरवर स्वाक्षरी करीत असतानाच दुसऱ्या मंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येऊ लागले. त्यामुळे 39 मंत्र्यांच्या शपथविधी लवकरात लवकर पार पडला. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. पारा चांगलाच घसरला आहे. तापमान सात अंश सेल्सिअसवर घसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये राजभवनातील लॉनवर उपस्थित लोकांना चांगलाच गारवा जाणवत होता.

जसजसा सूर्य अस्ताला जात होता, तसतसा गारवा वाढत चालला होता. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकर आटपावी असे सगळ्यांनाच वाटत होते. याशिवाय शपथविधी सोहळ्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांना घ्यायची होती. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खातेवाटपही करायचे होते. खातेवाटप केल्यानंतर ही यादी मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवावी लागते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर सोमवारपासून (16 डिसेंबर) अधिवेशनाला सुरुवात होणार होती. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सरकार पूर्णपणे सज्ज ठेवावे लागणार होते. त्यामुळेही शपथविधीचा सोहळा शक्य तितक्या लवकर पूर्ण होणे गरजेचे होते. योगायोगाने का होईना राज्यपालांच्या या आदेशानंतर शपथविधी वेगाने पूर्ण झाला.

Cabinet Expansion : नाईकांच्या बंगल्यात पुन्हा मंत्रिपद; उईकेंनाही लॉटरी

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता सरकार पूर्ण ताकदीने काम करणार आहे. राज्य मंत्रिमंडळातील सर्व 42 मंत्री तातडीने कामाला लागले आहेत. शपथविधी मध्ये सहभागी झालेल्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता सर्वच मंत्र्यांना आपला ‘परफॉर्मन्स’ दमदार दाखवावा लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!