Gondia : गुरुवार 27 जूनपासून विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असली, तरी शोकसभा घेऊन अधिवेशन उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज एक वाजता शिवालय येथे शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे, फडवणीस, पवार सरकारला टोमणे मारले आहेत. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचबरोबर सोबत ‘लाडकी बहीण ‘योजना आणताय, तसा ‘लाडका भाऊ’ योजना आणा.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
महिला पुरुष भेदभाव करू नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषदेत केली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांसाठी ‘लाडली बहना’ योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती , तीच मागणी उद्धव ठाकरेंनी रेटून धरली असल्याचे समोर आले आहे.
गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्य सरकारकडून महिलांना रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मोठी भेट देण्याकरीता कैबिनेट बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मध्य प्रदेशसारखी, महाराष्ट्रातही महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांच्यासमोर मांडली.
योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून महिलांना सक्षमीकरण आणि गरोदर महिलांना पौष्टिक आहार या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. गर्भवती महिलांना पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. जेणेकरून मुलांमध्ये कुपोषणाचा कोणताही पुरावा नसतो व आई आणि बाळ दोघेही निरोगी राहू शकतात,
Uddhav Thackeray : पावसाळी अधिवेशनात प्रेमाचा पाझर ; कुणी दिले चॉकलेट, कुणी घेतले हातात हात
अशा वेळी त्यांना आर्थिक मदत केली जाईल तर सोयीचे ठरेल. अशी मागणी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री सकारात्मक
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मध्य प्रदेशात सुरू असलेल्या लाडली बहना योजनेच्या आधारे महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे महिलांना घर चालविण्यास मदत होणार असून, गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून कुपोषणाचे प्रमाण कमी होईल, असेही आमदार विनोद अग्रवाल म्हणाले.
ठाकरेंचे समान प्रेम
या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरे यांनी स्त्री- पुरुष भेदभाव करू नका,असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. आज महिला सक्षम होत चालल्या आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाबरोबर आता पुरुष सक्षमीकरणावरही भर देण्याची गरज आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजने प्रमाणे ‘लाडका भाऊ’ योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली आहे.