महाराष्ट्र

Nana Patole : खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही!

Demand Resign :   सरकारने राजीनामा देऊन मोकळे व्हावे

 Congress : राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही. जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली. पण बैठकीला 5 पालकमंत्री गैरहजर होते. यातूनच सरकार दुष्काळाविषयी किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी जागेवरच आदेश द्यायला हवे होते. पण बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला. सरकारने आचारसंहितेचे बहाणे करुन टाळाटाळ करू नये, तातडीने जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. या सरकारला सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही. गरीब लोकांचे जीव जात आहेत पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळाने जनता होरपळत आहे. पण सरकार काहीही उपाययोजना करत नाही. पुण्यात धनदांडग्याच्या मुलाने गरिबाच्या दोघांना चिरडले तर निबंध लिहून त्याला सोडून दिले. डोंबिवलीत रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन 11 लोकांचा मृत्यू झाला व 60 जण जखमी झाले. डोंबवलीत यापूर्वी झालेल्या एका घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारने हे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतर आलेल्या महाभ्रष्ट युती सरकारने पैसे घेऊन ते कारखाने सुरुच ठेवले.

Vikas Thakre : अदानींसह तीन कंपन्यांसाठी 40 हजार कोटींचा ‘स्मार्ट घोटाळा’

लोकांच्या जिविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे पण खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही, जनाची नाही मनाची असेल तर शिंदे-भाजपा सरकारने राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असे नाना पटोले म्हणाले.

नवीन अभ्यासक्रमा संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, अभ्यासक्रमात जर मनुस्मृतीचा समावेश केला तर ते अजिबात चालणार नाही. काँग्रेस ते कदापि खपवून घेणार नाही. सर्व तपासून यासंदर्भात पुढची पाऊले उचलू, असे नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!