West Bengal : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात 17 जून सोमवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी 30 जण जखमी झाले. न्यू जलपाईगुडीच्या रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. कांचनजंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. कांचनजंगा एक्सप्रेस आसाममधील सिलचरमार्गे कोलकाताहून सियालदहला जात होती. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
आरजेडी नेते भाई वीरेंद्र यांनीही या अपघाताबाबत रेल्वेमंत्र्यांना राजीनामा देण्यास म्हंटले आहे. ते म्हणाले की, “ज्या देशात रेल्वेचे खाजगीकरण झाले आहे, तेथे अपघात होणे साहजिकच आहे. पूर्वी काँग्रेस आणि यूपीए सरकारमध्ये जेव्हा अपघात व्हायचे तेव्हा मंत्री राजीनामे देत असत. आता एवढी मोठी दुर्घटना घडल्यावर कोणताही मंत्री राजीनामा देत नाही.” या सरकारकडून कोणतीही आशा नाही, हे एक टोळी सरकार आहे. जे या गोष्टींना जबाबदार आहे. असे भाई विरेंद्र म्हणाले.
काँगेस आक्रमक..
या अपघाताबाबत काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची काँग्रेसने मागणी केली आहे. केरळ काँग्रेसचे सहकारी नितीश कुमार यांनी रेल्वे अपघातामुळे राजीनामा दिला होता. असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
नुकसानभरपाई जाहीर..
हा अपघात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी येथे सोमवारी एका मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिल्याने, पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले. या धडकेनंतर कांचनजंगा एक्स्प्रेसच्या किमान दोन बोगी रुळावरून घसरल्याचे सूत्रांनी सांगितले.
“अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मालगाडी कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकल्याने ही घटना घडली,” असे दार्जिलिंग पोलिसांचे अतिरिक्त एसपी अभिषेक रॉय यांनी सांगितले.