महाराष्ट्र

Lok Sabha Elections : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

Buldhana constituency : चक्क भाड्याने बोलावले जातात कार्यकर्ते !

Buldhana constituency : बुलढाणा लोकसभा निवडणुकी करिता 26 एप्रिलला होणार मतदान होणार आहे. 8 एप्रिल रोजी निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव तर शिवसेना उबाठा व महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, अपक्ष उम्मेदवार रविकांत तुपकर, आणि संदीप शेळके यांच्यात मुख्य लढत आहे. सामना हा चुरशीचा होणार असल्याचे चित्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. आता सर्वच पक्षांनी विजयासाठी तलवारी उपसल्यामुळे प्रचाराच्या रणागणांत कार्यकर्त्यांच्या रूपातील सैन्याला महत्त्व आले आहे. निवडणूक काळात बड्या नेत्यांच्या जाहीर सभांकरिता गर्दी जमविण्यासाठी नाश्ता, जेवण, प्रवासाची साधने व रोजंदारी देऊन तथाकथित कार्यकर्ते आणले जातात. सुरुवातीला दिवसाला ३०० ते ४०० रुपयांचे ‘वेतन’ मिळते. शिवाय रात्री बिअर, दारू आणि ताडीच्या पार्टीचा आस्वाद या कार्यकर्त्यांना मिळतो. प्रचार ज्वर जसा जसा वाढेल तसा या राजकीय रोजंदारीच्या दरातही वाढ होणार आहे.

या चुरशीच्या होत चाललेल्या निवडणुकीमध्ये मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते छोटे-मोठे पुढारी छोटे-मोठे राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना चांगलेच अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भाव मात्र या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेला दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या मर्जी राखण्यासाठी उमेदवारांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. मात्र आतापर्यंत आलेल्या अनुभवानुसार सर्वसामान्य मतदार व कार्यकर्त्यांना एकदा उमेदवार निवडून आला व खासदार झाला की तो मतदारांशी व कार्यकर्त्यांशी दुरावा ठेवून काही मोजक्याच लोकांशी संपर्क साधून असतो याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आज सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ते सजग झाले आहेत.

Lok Sabha Election :  हिम्मत असेल तर अपक्ष लढून दाखवा

चक्क भाड्याने बोलावले जातात कार्यकर्ते !

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मजूर कामगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मजूर पगारी कार्यकर्ते झाले आहे.आपली रॅली मोठी दिसावी, म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार प्रयत्न करत आहे. यासाठी चक्क भाड्याने कार्यकर्ते बोलावले जात आहेत. दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही तेवढा दोन तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. यामुळे नेहमी शेकडो कामगारांनी भरलेले अनेक शहरातील कामगार चौक ओस पडले आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातही प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे. मोठ-मोठ्या सभा, रॅली निघत आहेत. मात्र, या रॅली आणि सभेमध्ये अंगावर रूमाल आणि हातात झेंडा घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते हे भाड्याने आणले जाणारे मजूर आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या भाड्याच्या कार्यकर्त्याचा ट्रेंड सुरू आहे. महिला असल्यास 250 ते 400 रुपये आणि पुरुष असल्यास 300 ते 500 रुपये प्रत्येक रॅली, सभा असा दर सध्या सुरू आहे. शिवाय हॉटेलमध्ये जेवणही दिले जात आहे. दिवसभराचे काम करून जेवढे पैसे मिळतात, तेवढे एका प्रचारसभेत दोन तासांत मिळत असल्याने कामगार उमेदवारांच्या प्रचाराला जात आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात या मजुरांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!