Farmer Issue : गोंदियातील शेतकरी वर्ग आपल्या मागण्या घेऊन पुढे आला आहे. धानाला आठ हजार रुपयांपर्यंत भावाची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्याला स्वर्णा धानासाठी एक हजार एक रुपये, इतर मोठ्या धानाला पाच हजार तर बारीक धानाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची जाहीर घोषणा करून धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे. मंगळवारपासून (दि. 20 ऑगस्ट) तिरोडा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणावर बसणार आहेत.
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अल्पवृष्टी, कर्ज बाजारीपणा, आरोग्य, इतर वस्तूंच्या वाढत्या भावांमुळे शेतकऱ्यांना लागवड खर्च जास्त येत आहे. त्यात बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. आपल्या मुला-मुलींना योग्य शिक्षण व परिवाराला सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. शेतीला फक्त आठ तास वीज असल्यामुळे रात्री घर सोडून जागावे लागो.
कित्येक शेतकरी वीजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले तर काही शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचे भक्ष्य व्हावे लागले आहे. तर शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने नाइलाजास्तव कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
Assembly Election : जिंकण्याच्या लढाईत नवनवीन डावपेचांना उधाण
शेतकऱ्यांना मुख्य धारेत येता यावे यासाठी शेतकरी व माजी सरपंच नितेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजुरांनी 26 जून रोजी प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले होते. मात्र, मागण्यांची पूर्तता न झाल्याने खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजूर मंगळवारपासून तिरोडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे.
या आहे मागण्या
स्वर्णा धानाला एक हजार एक व इतर मोठ्या धानाला पाच हजार तसेच बारीक धानाला आठ हजार रुपये प्रति किंटल भाव देण्याची जाहीर घोषणा करा. खरेदी केंद्र सुरू करा, शेतकऱ्यांना पेरणी, रोहणी व धान कापणीसाठी रोहयोच्या मार्फत हेक्टरी 15 हजार रुपये मजुरीसाठी द्यावे. शेतकरी व शेतमजुरांच्या मुला-मुलींना पहिल्या वर्गापासून सैनिक व जवाहर नवोदय संस्थेत मोफत शिक्षण तसेच शासकीय नोकरीकरिता अर्ज करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून नोकरीत 20 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या आहेत.
सर्व शेतकरी व शेतमजुरांना आठ दिवसांच्या आत वीज जोडणी द्या, एकरी एक लक्ष रुपय कर्ज द्यावे. शेतीसाठी 24 तास मोफत वीजपुरवठा द्यावा, घरकुलासाठी एक लक्ष 50 हजार रुपयांऐवजी तीन लक्ष रुपये द्यावे, दर महिन्याला प्रति व्यक्ती 10 किलो मोफत धान्य, दोन किलो साखर व तीन किलो तूर डाळ द्यावी यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.