देश / विदेश

Sanjay Raut : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून गुंडांसाठी तुरुंगात फोन जातात

Shiv Sena : संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Political War :  लोकसभा निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीला नवचैतन्य मिळाले आहे. अशात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यात रोजच कुणी नेता पुढे येतो आणि कधी गौप्यस्फोट करतो तर कधी खळबळजनक दावा. या अशा वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणात चांगलाच आगीचा भडका उडतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. सरकार गुंडांच्या हातात आहे. गुंडांना पोसणाऱ्यांचे सरकार आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात हे सांगितले जात आहे. गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत झाल्याने ‘कोयता गॅंग’ आणि त्याचे सूत्रधार सहाव्या माळ्यावर बसले आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठे वक्तव्य

संजय राऊत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबतही मोठे विधान केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. जनतेने त्यांना कौल दिला त्यामुळेच ते आपल्या पदावर कायम आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना तुरुंगात ठेवल्याने त्याचा राजकीय परिणाम होत आहे.

Akola BJP : ‘मॅच के मुजरीम’ची कराडांपुढे सामूहिक ‘प्लॅन्ड’ तक्रार

अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीतील इतर काही मंत्र्यांना अटक करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ईडी आणि सीबीआयने काही लोकांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाबाबत धक्कादायक माहिती देताना, दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या जामीनाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली. हायकोर्टाची सुनावणी होईपर्यंत ट्रायल कोर्टाचा आदेश लागू होणार नाही, असे कोर्टाचे म्हणणे आहे, असेही राऊतांनी सांगितले.

केजरीवालांचा एवढाच दोष की..

अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला, एवढाच केजरीवाल यांचा दोष आहे. त्यामुळे काही खोट्या प्रकरणांची उभारणी करून त्यांना अटक करण्यात आली, असेही संजय राऊत म्हणाले. खोट्या प्रकरणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशात लोकशाही डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे.

Death Threat : बच्चू कडूंना जीवे मारण्याची धमकी ; खळबळजनक पत्र

या खेळात ईडी, सीबीआय आणि पोलीसांचा वापर केला जातो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही संपवण्याचा जनादेश मिळाला. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे त्यांना बहुमत नाकारण्यात आले.

पोलीस आणि प्रशासन गुंडांच्या टोळी प्रमाणे

संजय राऊत यांनी पोलीस भरतीवरून सरकारवर टिका केली. सध्याचे सरकार कुठे चालले आहे हे स्पष्ट नाही. पोलीस आणि प्रशासन गुंडांच्या टोळी प्रमाणे आणि अंडरवर्ल्ड प्रमाणे चालल्याचा घणाघात त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या योग करण्याबाबत राऊतांनी टोला लगावला. योग करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, देशातील सध्याच्या स्थितीत हा योग किती उपयुक्त आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले.

 

error: Content is protected !!