महाराष्ट्र

Ravikant Tupkar : सिंदखेडराजातून पेटली शेतकऱ्यांच्या लढ्याची ज्योत

Buldhana : शेतकऱ्यांच्या साथीने तुपकरांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Strike : बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झाले. आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिजाऊ राजवाडा समोर आपल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. बुधवार, ४ सप्टेंबरला रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह सिंदखेडराजात पोहचले. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन त्यांनी आंदोलनस्थळी आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

अतिवृष्टी वर एक नजर

अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर ते सिंदखेडराजात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मोठ्या संख्येने शेतकरी देखील येथे दाखल झाले. त्यामुळे आंदोलन स्थळाला मेळाव्याचे स्वरूप आले होते. ‘हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थान समोर आम्ही हे आंदोलन करीत आहोत. या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी केली आहे. सिंदखेडराजाला आला सोयाबीन-कापसाच्या आंदोलनाचे केंद्र करायचे आहे,’ असे रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले.

सोयाबीन-कापूस तसेच पिकविमा, शेतकरी, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही, असेही तुपकरांनी सांगितले.

अंबानी-अदानीचे कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अद्याप जमा झाला नाही. नेते तारखांवर तारखा देत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पिकविम्याची रक्कम जमा होईल असे नेते सांगत होते. तोपर्यंत आपण वाट पहिली मात्र आता आपली सहनशीलता संपली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिजाऊंचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.

एकट्याची लढाई नाही

ही लढाई माझी एकट्याची नाही. हा सर्व शेतकऱ्यांचा लढा आहे. त्यामुळे सर्वांना या आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट सरकारला झुकायला भाग पडेल, असा विश्वास व्यक्त करत रविकांत तुपकर यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पुढे नेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सिंदखेडराजा येथे आंदोलन सुरू असले तरी या आंदोलनाची धग राज्यभर पोहोचणार आहे. आणि राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Shivaji Maharaj statue : सरकारविरोधात चंद्रपूरमध्ये आंदोलन

8 सप्टेंबरला चक्काजाम

5 सप्टेंबरला सर्व शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतील. 6 सप्टेंबरला महाराष्ट्रातील गावागावांत प्रभातफेऱ्या निघतील. 7 सप्टेंबरला ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेतले जातील. तर 8 सप्टेंबरला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली.

तर समृद्धीवर बैलगाड्या नेणार

रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गुरुवार, 5 सप्टेंबरपासून वेगवेगळी आंदोलने होणार आहेत. 5 सप्टेंबरला शेतकरी आपापल्या भागातील तहसीलदार व जिल्हापातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. ६ सप्टेंबरला गावागावात प्रभारतफेरी निघेल. ७ सप्टेंबरला ग्रामपंचायतचे ठराव घ्यावे,असे आवाहनही तुपकर यांनी केले आहे. ८ सप्टेंबरला रविवारी सगळीकडे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. समृध्दी महामार्ग देखील अडवू, समृध्दी महामार्गावर बैलगाड्या घेऊन पोहोचू, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

सपोर्ट फॉर फार्मर

तुपकरांच्या या आंदोलनाला गावगाड्यातील व खेड्यापाड्यातील शेतकरी- शेतमजुरांनी समर्थन दिले पाहिजे. तसेच शहरी भागातील नागरिकांनी देखील शेतकऱ्यांच्या लढाईला समर्थन देणे गरजेचे आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन द्यावे, असे आवाहन केले आहे. व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करा, सपोर्ट फॉर फार्मर अशी एक मोहीम सोशल मीडियावर राबवा असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!