महाराष्ट्र

Hasan Mushrif : मुख्यमंत्री होणार नाही. पण उपमुख्यमंत्री नक्की होईन

Assembly Election : हसन मुश्रीफांना पडताहेत स्वप्न

Mahayuti  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे पक्ष निवडणुकीला सामोरे जात असले तरी महायुती किंवा मविआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. महायुतीने म्हटलं आहे की ‘आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत’. तर, मविआ नेत्यांनी म्हटलं आहे की ‘निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदासाठीचा नेता ठरवू.’ मविआमध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, अजित पवारांचा पक्ष दोन-दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पक्षातील वरिष्ठ नेते हसन मुश्रीफांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे.

काय म्हणाले..

येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कागल विधानसभा मतदरासंघातून महायुतीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शरद पवारांकडून समरजितसिंह घाटगे यांना तिकीट देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

मुश्रीफ म्हणाले की, ‘विक्रम सिंह घाटगे यांनी काढलेला शाहू मिल्क कारखाना बंद पाडणे म्हणजे शाश्वत विकास आहे का? शाहू कारखाना कर्जात घालवणे म्हणजे तुमचा शाश्वत विकास आहे का? मला तुमचे पुढचे 21 दिवस द्या, मी तुम्हाला माझं काळीज देईन. जर पुन्हा निवडून आलो तर मी मुख्यमंत्री होणार नाही. पण उपमुख्यमंत्री नक्की होईन. काही राज्यात दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. हसन मुश्रीफ यांनी आज कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाषण केले.

हमाल म्हणून काम करेन

हसन मुश्रीफ पुढे म्हणले की, मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. पण माझा फॉर्म भरायला इतकी गर्दी याआधी कधीच पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक माझ्या या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. गेली 25 वर्षे तुम्ही मला निवडून देताय, त्यातील 19 वर्षे तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आता पुढची पाच वर्ष मला संधी दिली तर मी तुमचा हमाल म्हणून काम करेन”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!