Fourth Phase Voting : चौथ्या टप्प्यात रावेर मतदारसंघात मतदान झाले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांच्या तुलनेत ‘पुरुषशक्ती’ वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. 2019 च्या निवडणुकीत रावेर मधील मलकापूर विधानसभा मतदारसंघात 67.01 सरासरी मतदान झाले होते. 2024 च्या निवडणुकीत 67.36 टक्के मतदान झाले. त्यामुळे या निवडणुकीत केवळ 00.35 टक्के मतदानात वाढ झालेली दिसते.
18 व्या लोकसभा निवडणुकीत 13 मे रोजी रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. विदर्भ व खान्देशातील 67.36 % मतदान झाले. 19 लाख 81 हजार 750 मतदारांपैकी 11 लाख 47 हजार 965 मतदारांनी मतदान केले.
यामध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघात मतदार संख्या 2 लाख 80 हजार 762 आहे. त्यापैकी 1 लाख 89 हजार 133 मतदारांनी मतदान केले. या विधानसभेत सरासरी 63.36 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 47 हजार 68 पैकी 1 लाख 2 हजार 250 पुरुष मतदारांचे सरासरी 68.53 टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत महिला मतदानात आघाडी घेतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 33 हजार 688 पैकी फक्त 86 हजार 882 महिला मतदारांनी मतदान केले. सरासरी 61.34 टक्के. मलकापूर विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान कमीच आहे. अलीकडच्या काळात कुठल्याही क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या धर्तीवर लोकसभेच्या निवडणुकीत महिला आघाडीवर राहतील, शिवाय त्यांचे मतदान निर्णायक ठरते.परंतु महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांनी आघाडी घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले.
तो आकडा कायम..
सन 2019 च्या निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात 67.01 टक्के मतदान झाले. यावेळी 67.36 टक्के मतदान झाले. त्यामुळे या निवडणुकीत केवळ 00.35 टक्के मतदानात वाढ झाली. त्यावरून या मतदारसंघात झालेले मतदान स्टेबल असल्याचे स्पष्ट झाले.