Buldhana constituency : आगामी काळातील सण, उत्सव व लोकसभा निवडणूक काळात तेढ निर्माण होवू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, गुन्हेगारांवर वचक राहावा. तसेच पोलिस नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे सरंक्षणा करीता सजग व तयार आहे यासाठी आज बुलढाणा पोलिस व दंगा काबु पथकाने जयस्तंभ चौकात मॉक ड्रिल केली.
मॉक ड्रिल मध्ये बेकायदेशीर जमावावर अश्रुधूर नळकांड्या फोडणे, हँन्ड ग्रेनेड जमावावर फेकणे तसेच गैरकायद्याने जमाव भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले. अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पथकातील अंमलदार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांकडून संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी पोलिस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. जिल्ह्यात पोलिसांकडून संरक्षण (पोलिस प्रोटेक्शन) पुरविण्यात आले आहे. पोलिस संरक्षण व्यवस्थेत 50 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहाेचत असतानाच पोलिसांच्या धडक कारवाईने निवडणूक लढवणारे बाहुबली आणि त्यांच्या कुख्यात समर्थकांमध्ये धडकी भरली आहे. अशातच पोलिसांनी 200 च्या वर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. निवडणूक लढवणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना चांगल्या प्रकारे ‘समज’ देण्यात आली आहे. या कारवाईसह दैनंदिन हजेरीही सुरू ठेवली आहे. तीन गुन्हेगारांना तडीपार केले आहे. पाच जणांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
Buldhana Administrative : स्वतःच्या तोंडाला काळे फासून 48 तासांची दिली डेडलाईन !
गुन्हेगारांची तपासणी
कोम्बिंग,ऑलआउट कारवाईसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सुरू आहे. या गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत नियमित कारवाई सुरू असल्याने बहुतांश गुन्हेगारांनी कारवाईचा धसका घेत शहरातून पलायन केले आहे.