महाराष्ट्र

Charan Waghmare : रविवारी घेणार ‘तुतारी’ हाती

Bhandara Politics : बीआरएसच्या कारमधून पडणार बाहेर

Defection Before Election : लोकसभा निवडणुकीपर्यंत आंध्र प्रदेशातील के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS) ‘कार’मधून फिरणारे माजी आमदार चरण वाघमारे यांनी आता वेगळा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रविवारी (ता. 13) वाघमारे हे अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे वाघमारे सिमोल्लंघनासाठी निघाले आहेत.

आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांना बीआरएसची कार पंक्चर केली. त्यामुळे केसीआर यांची सत्ता गेली. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. भारत राष्ट्र समितीचे कार्य महाराष्ट्रात थांबले आहे. बीआरएसच्या भवितव्यावरही आता महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह लागले आहे. अशात राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नरत असलेले माजी आमदार चरण वाघमारे हे राव यांच्या ‘कार’मधील शेजारची सिट सोडणार आहेत.

माजी आमदार चरण वाघमारे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही क्षणी वाघमारे साहेबांच्या पक्षाची तुतारी हाती घेऊ शकतात. यासाठी त्यांना सतत फोनवरून संपर्क सुरू झाला आहे. लवकरच वाघमारे साहेबांच्या पक्षातील दिसतील हे जवळपास निश्चित झाले आहे. चरण वाघमारे यांच्या पक्षप्रवेशानंतर भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट चुरशीचा सामना होणार आहे. साहेबांच्या गटात प्रवेश करताच वाघमारे यांना तुमसर मोहाडी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.

आमने-सामने लढत

चरण वाघमारे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते साहेबांच्या गटातून तुमसर मोहाडी मतदार संघाचे उमेदवार असतील. त्यामुळे वाघमारे हे अजितदादांचे शिलेदार व तुमसर मोहाडीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना थेट आमने-सामने आव्हान देणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चरण वाघमारे हे भंडाऱ्याच्या राजकारणात पुन्हा दमदार पद्धतीने सक्रिय झालेत. त्यांनी महायुती सरकार आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात आघाडी उघडली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करणे सुरू केले. त्यामुळे चरण वाघमारे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जाऊ शकतात असे सांगण्यात येत होते. मात्र ते आघाडीतील नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबद्दल ठामपणे सांगता येत नव्हते. आता हे चित्र स्पष्ट झाले आहे.

Charan Waghmare : लाडक्या बहिणींसाठी अश्लील भाषा; कारवाई कधी?

महायुती (Mahayuti) सरकारमध्ये जाण्यासाठी अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली. जाताना अजितदादा केवळ आमदार घेऊन बाहेर पडले नाही. त्यांनी पक्षाचे ‘घड्याळ’ हे चिन्हही नेले. पक्षाचे नावही नेले. अनेक वर्षांपूर्वी शरद पवार हे काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हे सर्वश्रूत आहे. सुरुवातीपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. या आघाडीने अनेक वर्ष महाराष्ट्रात सत्ता गाजविली. केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत (UPA) आहे. आता त्याचे नाव ‘इंडिया’ असे झाले आहे. त्यामुळे अजितदादा यांनी साहेबांना धोका दिला अशी भावना त्यांच्यासोबत न गेलेल्या नेत्यांची आहे.

अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी योग्य ते उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी गुलाबी रंग धारण करीत राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहे. अशातच भंडाऱ्यात चरण वाघमारे आता शरद पवारांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे राजू कारेमोरे यांचा थेट आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीला नवा गडी सापडला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!