महाराष्ट्र

Buldhana : राजकारणात गलिच्छवीरांची संख्या जास्त वाढली

NCP: आमदार शिंगणेंनीही नामोल्लेख टाळून फटकारले

Political War : वाचाळविरांनी मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचले होते. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंनीही गायकवाडांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला.

नामोल्लेख टाळून फटकारले.

‘राजकारणात गलिच्छवीरांची संख्या वाढली आहे. त्यांना शासनाने एकदाची चांगली समज द्यावी,’ अशा शब्दांत सिंदखेडराजा- देऊळगावराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आमदार गायकवाड यांना नामोल्लेख टाळून फटकारले. रविवारी मलकापूर पांग्रा येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा नाही. तुम्ही महत्त्वाचे आहात. १९९५ साली अपक्ष निवडणूक लढविली तेव्हा मला ३५ हजार मताधिक्याने निवडून दिले होते. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याची चिंता तुम्ही करु नका. मीही करीत नाही,’ अशी राजकीय गुगली डॉ. शिंगणे यांनी टाकली.

डॉ. शिंगणे म्हणाले, ‘महाराष्ट्र गांधी, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालत आहे. अलीकडच्या काळात राजकारणात गलिच्छ भाषेचा वापर जास्त केला जात आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात ही भाषा चालत नाही. याचा परिणाम समाजावर काय होईल, याचा विचार केला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन हा निर्णय चांगला आहे. दरवर्षी निवडणुकांमुळे वेळ जातो. कामांना उशीर होतो. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज शासन धडाधड निर्णय घेऊन योजनांचा पाऊस पाडत आहे. सोयाबीन, कापूस यांचे भावही निश्चित केले आहे. सर्वकाही निर्णय तुमच्यासाठी आहेत.’

Assembly Elections : वंचितच्या पहिल्या यादीत सिंदखेडराजाला स्थान !

 ग्रामपंचायत लढलेल्यानाही आमदार व्हायचंय

आज भावी आमदार म्हणून अनेक लोक मतदारसंघात फिरत आहेत. मतदारसंघात गावे किती, तालुके किती, भौगोलिक क्षेत्रफळ किती, समस्या काय याची त्यांना माहिती नाही. ग्रामपंचायती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक न लढलेलेसुध्दा फिरत आहेत. अशा शब्दांत त्यांनी आमदारकीसाठी बाशिंग बासून बसलेल्या नेतृत्वाला फटकारले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!