महाराष्ट्र

Nagpur News : भाजप माजी नगरसेविकेने घेतला आत्मदहनाचा निर्णय

Water Shortage : रमाई नगरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मागितली दाद

Water Issue : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीला सामाजिक न्याय दिनी 26 जुन रोजी नागपूरातील कामठी येथील प्रभाग 15 च्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी त्यांच्या सात समर्थकांसह नगर परिषद प्रशासना विरोधात आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन 21 जून शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना दिले आहे.

रमाई नगरात मागील 10 वर्षांपासून जवळपास 60/70 घरांना पाणी पुरवठा होत नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत पाईपलाईन मंजूर करण्यात आली. त्या बाबतची फाइल नगर परिषद पाणी पुरवठा विभागात कपाटबंद आहे. स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, रमाई नगरातील नागरिक आजही पाणी टंचाई ला तोंड देत आहेत.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

लोकसभा निवडणुकी पुर्वी स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन, तक्रार, विनंती अर्ज माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात प्रशासक संदीप बोरकर यांना देण्यात आले होते. थाळी नाद आणि माठ फोड़ो आंदोलन देखील करण्यात आले. पण मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या प्रशासनाला जाग आली नाही.

मतदानावर बहिष्कार

लोकसभा निवडणुकी दरम्यान रमाई नगरातील नागरिकांनी मतदाना वर बहिष्कार टाकण्याचे निवेदन सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांना दिले होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्ती मुळे मतदाना वरिल बहिष्कार मागे घेतला.

मतदाना नंतर 2 पाईपलाईन ची मागणी असताना एकच पाईपलाईन टाकण्यात आली. एप्रिल महिन्यात टाकलेली पाईपलाईन अद्यापही मेन पाईपलाईनला जोड़ण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही या भागात पाणी पूरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळेच रमाई नगरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Buldhana Politics : फडणवीस यांचे विश्वासू आमदार होणार पुन्हा शंभर दिवसांचे मंत्री ?

त्यामुळे सात समर्थकांसह आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांना 21 जून शुक्रवारी देण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!