महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : आपलं पाप लपवण्यासाठी काँग्रेसचा खोटा डाव

Constitution Of India : काँग्रेसकडूनच संविधानाची पायमल्ली

Assembly Election : काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.

एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. विकासाची गंगा वाहत असल्याने विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागले आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर अपप्रचार करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

भ्रष्टाचाराला खतपाणी

काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला. यामुळे देशभरातील नागरिकांना आता थेट लाभ मिळत आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भ्रष्टाचाराला यामुळे मोठा बसला आहे. जनतेचा पैसा थेट जनतेच्या हातात पडत आहे. असा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून केला.

Sudhir Mungantiwar : दुचाकीवर निघाले सुधीर मुनगंटीवार!

गरिबी नव्हे गरीब हटले

काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. सुरुवातीपासून काँग्रेस हेच करीत आली आहे. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मात्र सरकारच्या सर्वच योजना सामान्यांच्या हिताच्या आहे. त्यामुळे वास्तविकतेत गरिबी हटावचे काम भाजपने केले आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!