Amravati constituency : ज्या लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशातील राजकीय तज्ञांचे लक्ष आहे त्या अमरावती मतदारसंघात आता प्रचार तापू लागला आहे. यासोबतच महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा निवडणुकीत रंगत आणू शकतात. खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती राणा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह 11 पक्षांचे बळ घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार नवनीत राणा सध्या प्रचारात आघाडीवर आहेत.
त्यांच्या प्रचाराला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते स्थानिक नेत्यांच्या बैठकीसह प्रचार सभा सुद्धा घेणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या दर्यापूर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अमित शहा कुठल्या मुद्यावर लक्ष केंद्रित करतात व मतदारांना कुठली आश्वासने देतात यावर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election : धावपट्टीच नसल्याने मनसेचे ‘इंजिन’कुठपर्यंत ओढणार राणांची गाडी?
याकरिता आतापासूनच सभा मंडपाची तयारी उत्कृष्ट साऊंड सिस्टिम व एलईडी स्क्रीन सह डिजिटल प्रचारावर भर देण्यात येत आहे. नवनीत राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वाॅर रूम मधून विविध पद्धतीने व्हिडिओ मिम्स व पोस्टर प्रकाशित करण्यात येत आहे. प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो अधिक प्रभावी व्हावा असा प्रयत्न आहे. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला जात आहे.