प्रशासन

Lok Sabha Election : अगोदर होणार टपाली मतमोजणी,यंत्रणा सज्ज

Voting Preparation : प्रत्येक विधानसभानिहाय 14 मतमोजणी टेबल

Jalgaon Lok Sabha : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 4 जूनला मतमोजणी होणार आहे. या प्रक्रियेची पारदर्शक तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभानिहाय 14 मतमोजणी टेबल असतील. एका टेबलवर 1 मतमोजणी प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला नियुक्त करता येईल. तसे उमेदवारांना लेखी कळविले आहे. निवडणूक प्रशासनाकडून प्रत्येक टेबलसाठी एका सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

टपाली मतमोजणी 18 टेबलवर

टपाली मतमोजणीसाठी जळगावसाठी 10 आणि रावेरसाठी 8 टेबल ठेवले राहतील. तिथेही प्रत्येक टेबलनिहाय 1 याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी असतील. उमेदवारांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आपापल्या ओळखपत्रासह सकाळी सातला मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहतील.

मतमोजणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी रिटर्निंग ऑफिसर पुरेशा संख्येने मोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. यात राखीव जागा असतील. या अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सखोल प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी, अधिकारी पहाटे साडेपाचपर्यंत केंद्रावर पोहोचतील. त्यांचे फोटो ओळखपत्र घेऊन जातील आणि आरओ आणि एआरओच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करतील.

अगोदर होणार पोस्टल मतमोजणी

ईव्हीएम मतदानापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. मतपत्रिका मतमोजणी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. यात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एआरओ), एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून, पारदर्शकतेसाठी या प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.

Lok Sabha Election : टेन्शन घेऊ नका…तुम्ही केलेले मतदान एकदम सुरक्षित !

पोस्टल बॅलेट काय असतात?

मतमोजणी सुरू होताना सर्वात अगोदर पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाते. यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी होते. नियमानुसार पोस्टल बॅलेट ईव्हीएममधील मतांच्या अगोदरच मोजले जातात. पोस्टल बॅलेटची मतं म्हणजे मत पत्रांवर आलेली मते असतात, संख्याही कमी असल्यामुळे मोजणी सोपी होते. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नसते. पेपर्स मतपत्रिका असतात. या माध्यमातून मतदाराने मतदानाचा हक्क बजावलेला असतो. ड्युटीवर असणारे कर्मचारी, सैन्यातील जवान यांनाच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त कुणालाही अशी सुविधा दिली जात नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अटक केलेल्या व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा दिली जाते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!