महाराष्ट्र

Assembly Election : मध्य नागपुरात भाजपचे ‘करायला गेले काय आणि उलटे झाले पाय’

Nagpur : आता मुस्लीम उमेदवाराचाही अर्ज अवैध; दटकेंच्या अडचणी वाढल्या

Mahayuti Vs congress नागपूर मध्य आणि पश्चिम या दोन मतदारसंघांमध्ये भाजपने सर्वाधिक सस्पेंस ठेवला. पश्चिम नागपूरमध्ये इच्छुकांची गर्दी होती. तर मध्य नागपुरात फक्त दोन उमेदवारांमध्ये चुरस होती. पश्चिममध्ये दक्षिणचा उमेदवार देऊन भाजपने पायावर धोंडा पाडून घेतला आहे, असे बोलले जात आहे. मात्र मध्य नागपुरात भाजपची ‘करायला गेले काय आणि उलटे झाले पाय’ अशी अवस्था झाली आहे.

भापजचे तीन टर्म

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ भाजपला सलग तीन टर्म आपल्याकडे ठेवता आला तो केवळ हलबा समाजाच्या भरवशावर. विकास कुंभारे येथील विद्यमान आमदार आहेत. ते हलबा समाजाचे असल्यामुळे भाजपच्या पाठिशी हा समाज गेल्या 15 वर्षांपासून खंबीरपणे उभा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपमध्ये आता उमेदवार बदलावा, अशी अंतर्गत मागणी होऊ लागली. पण तेव्हा टळलेली घटना यंदा घडली. भाजपने उमेदवार बदलला. हलबा समाजाचा रोष ओढवून घेतला. प्रवीण दटके यांना मध्यमधून लढण्याची संधी देण्यात आली आहे.

प्रवीण दटके हलबा, मुस्लीम आणि दलित समाजाला कसे मॅनेज करणार, हा प्रश्न कायम होता. तोच हलबा समाजातून अपक्ष उमेदवार रिंगणात आले. त्यातही 4 नोव्हेंबरनंतर एकच जण मैदानात राहील असे पक्षाने ठरवले आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद दोन दिवस आधी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. त्यांना एबी फॉर्म मिळाला. आता ते मुस्लीम आणि दलित मते आपल्याकडे वळवतील. काँग्रेसला नुकसान होईल आणि भाजपला फायदा होईल, असे वाटायला लागले. तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनिस अहमद उशिरा पोहोचले. त्यामुळे त्यांचाही विषय संपुष्टात आला.

मात्र या गर्दीत माजी नगरसेवक व मुस्लीम लिगचे असलम खान यांचेही नाव होते. त्यामुळे प्रवीण दटके यांना दिलासा मिळाला होता. मध्य नागपुरात मोठ्या प्रमाणात मुस्लीम मतदार आहेत. किमान तेवढे तरी काँग्रेसकडे जाण्यापासून थांबतील आणि असलम खान यांना मिळतील. हे निश्चित होते. भाजपच्या दुर्दैवाने छाननीमध्ये असलम खान यांचाही अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. त्यामुळे दटकेंपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसने हलबा, मुस्लीम किंवा दलित असा विचार न करता गेल्यावेळी चांगली कामगिरी करणारे बंटी शेळके यांना उमेदवारी दिली. सलग दुसऱ्यांदा पक्षाने विश्वास टाकल्याने ते चांगलेच तयारीला लागले आहेत, हे विशेष.

Akola MNS : निवडणुकीतील आर्थिक देवाणघेवाणीमुळे अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला? 

नेमके काय घडले?

माजी नगरसेवक असलम खान यांनी मुस्लीम लिगच्या वतीने उमेदवारी दाखल केली. बुधवारी सायंकाळी त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. मात्र त्याच दिवशी रात्री त्यांच्या अर्जात निवडणूक अधिकाऱ्यांना त्रुटी आढळली. 10 अनुमोदकांची स्वाक्षरी आवश्यक असताना असलम खान यांच्या अर्जावर एकच स्वाक्षरी होती. अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात खोडतोड होती. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!