Ravikant Tupkar : बुलढाणा लोकसभेच्या निवडणूक सामन्याला आता फक्त सहा दिवस राहिले आहेत. सर्वच उम्मेदवारांचे प्रचार कार्य आता अंतिम टप्प्यात आहे. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांच्या जाहीर सभा, रोड शो, रॅली होत आहेत. 42 डिग्री तापमानात कार्यकर्ते त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण त्यांच्या प्रचार रॅलीच्या मार्गावर त्यांना आपल्या लाडक्या नेत्याला मिरवत आहेत. तुपकारांसाठी कार्यकर्तेच गाडी आणि घोडा बनत असल्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
रविकांत तुपकर यांचा प्रचार जोरदार सुरु आहे. तुपकर यांना कार्यकर्ते खांद्यावर घेऊन प्रचार फेरी करता फिरवत आहे. अपक्ष असूनही त्यांना आता जनसामान्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भर उन्हामध्ये कार्यकर्ते आळीपाळीने तुपकरांना प्रचार रॅलीच्या मार्गावर फिरवत आहेत. काल खामगावच्या रॅलीत हेच चित्र पाहायला मिळाले.
रविकांत तुपकर यांच्या आता जनसामान्यातून सभा पाहिल्या तर एखाद्या मोठ्या पक्षालाही विचार करायला भाग पाडेल अशी स्थिती आहे.
Lok Sabha Election : तुमचं लेकरू समजून रविकांतला आशीर्वाद द्या!
एकीकडे पक्ष फोडापाडी, एका पक्षाचे दोन गट आणि उद्या कोण कुठे राहील याची शाश्वती नसताना राजकारण व लोकप्रतिनिधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मागील काही घटनांमुळे रसातळाला गेला आहे. पण, ज्या पद्धतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात युवा नेतृत्व रविकांत तुपकर यांना चक्क कार्यकर्ते खांद्यावर घेऊन प्रचारफेरीत फिरवत आहेत. हे चित्र राजकारणात कायमस्वरूपी टिकणे गरजेचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.