महाराष्ट्र

Lok Sabha Election : मद्यप्रेमींना झटका, ‘या’ दिवशी मिळणार नाही दारू!        

Buldhana Constituency : जिल्ह्यात पाच दिवस ड्राय डे जाहीर !

Buldhana constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी 24 ते 26 एप्रिल आणि त्यापूर्वी 21 एप्रिल रोजी महावीर जयंती आणि 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. 

त्यानुसार आठवड्यातील पाच दिवस जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यामुळे मद्यप्रेमींना दारू मिळणार नाही.

निवडणुका खुल्या, निर्भय, शांततेच्या वातावरणात, पार पाडण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी), तसेच मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार तसेच त्या अंतर्गत केलेल्या विविध नियमानुसार मतदानासाठी तीन दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येतील.

24 एप्रिल रोजी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 5 वाजल्यापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ आणि मलकापूर, नांदुरा तालुक्यालगत पाच किलोमीटर परिसरातील सदर तालुक्यातील भाग येथे मद्य विक्री बंद राहील. 25 एप्रिल रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस आणि 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील. तसेच मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहील.

बुलढाणा जिल्ह्या लगत रावेर, जालना, औरंगाबाद, मध्यप्रदेशातील बऱ्हानपूर मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 11 मे रोजी रावेर मतदारसंघात समाविष्ट मलकापूर आणि नांदुरा येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून मद्यविक्री बंद राहील. तसेच मतदानापूर्वीचा दिवस आणि मतदानाचा दिवस 12 आणि दि. 13 मे रोजी जिल्ह्यातील रावेर मतदारसंघालगत 5 किलोमीटर परिसरात जिल्ह्यातील भागात मद्यविक्री बंद राहणार आहे.

Buldhana Crime : पोलिसांची बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या दोघांना अटक

आदेशाची जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. अनुज्ञप्तीधारक आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!