महाराष्ट्र

FIR Registered : आमदार नितेश राणेंवर गुन्हा; आक्षेपार्ह विधान भोवलं

Nitesh Rane : रामगिरी महाराजांना निषेध केला तर घुसून मारू 

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंवर भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 153 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘रामगिरी महाराजांना विरोध केला तर मशिदीमध्ये घुसून मारू’, असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं होतं.

अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. यात बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचाही निषेध नोंदविण्यात आला. या मोर्चादरम्यान नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी आक्षेपार्ह हावभाव देखील केले होते, असे तक्रारीत नमूद आहे. नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला उघडपणे धमकी दिली, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक पैंगबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

एक गुन्हा श्रीरामपूर तर दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. वास्तविक रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीनंतर नितेश राणेंची सभा झाली. त्यात त्यांनी मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली. यानंतर त्यांच्याविरोधात कलम 302, कलम 153 सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपुर येथे रामगीरी महाराजांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जेसीबीवर बसुन नितेश राणे सहभागी झाले. या जाहीर सभेत नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी केलेलं विधान सोशल मीडियावर व्हायरल झालंय. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी व्हिडीओ शेअर करुन नितेश राणे धार्मिक हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा पोहचल्यानंतर नितेश राणे यांनी मशिदीच्या दिशेनं बोट केलं. आणि आक्षेपार्ह इशारा केला, असा आरोप आहे. तसंच मुस्लीम धर्माच्या भावना दुखवल्या प्रकरणी नितेश राणेंसह सागर बेग, आकाश बेग आणि संघपाळ या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन ठिकाणी गुन्हे दाखल 

नितेश राणेंविरोधात एक नव्हे तर दोन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिलं प्रकरण श्रीरामपूर तर दुसरं तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवलं गेलं. नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला उघडपणं धमकी दिली, असं तक्रारदाराने म्हटलंय.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!