महाराष्ट्र

Bhandara Police : धाडस करून तरूणी तक्रार द्यायली गेली, पण पोलिस अधिकाऱ्याने…

Abuse of Girl : भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्यावर गुन्हा दाखल.

Police Department : प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. भंडारा पोलिस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक बनत चालल्याने विश्वास ठेवावा तर कुणावर, असा प्रश्न आता जनतेसमोर उपस्थित झाला आहे.

लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तेथे तिची ओळख एका तरूणासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली.

Modi 3.0 : ईव्हीएमबाबत मोदी म्हणाले..

तरुणीने प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली होती. तेव्हा भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली.

हा सर्व प्रकार भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेऊन तरूणीने सांगितला. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 अ , 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!