महाराष्ट्र

Lok Sabha Election : बच्चू कडूंची तक्रार; भाजप नेते प्रवीण तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा

Amravati Constituency : बदनामी, राजकीय प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Political War : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीच्या अचलपूर विधानसभा प्रमुख असलेले प्रवीण तायडे यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती शहरातील राजपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत आमदार कडू यांनी सोमवार, 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाजपचे प्रवीण तायडे यांनी 4 एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या जाहीर सभेत आपल्याविरुद्ध बदनामी व राजकीय प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला. ‘आमदार कडू हे उमेदवार टाकायचे पैसे घेतात. न टाकायचेही पैसे घेतात. बच्चू कडू हा वसुलीबाज व नौटंकी आहे. हा आमदार सत्यानाश करायच्या मागे लागला आहे. नाव शेतकऱ्याचे घेतो, नाव शेतमजुराचे घेतो अशा अनेक गोष्टी आहेत. एक उद्योगधंदा अचलपुरात आणू शकला नाही. फिनले मिलबद्दल बोलतो. फिनले मिल विकत घेण्याचा डाव होता. तुमच्या जवळ एवढा पैसा कोठून येतो. तुम्ही दोन हजार कोटीचे मालक आहात’, असे भाष्य तायडे यांनी केले होते.

Lok Sabha Election : अकोल्यातही भाजपच्या विरोधात बच्चू कडूंचा ‘प्रहार’

‘तुम्ही वेगवेगल्या धंद्याच्या माध्यमातून बांधकाम कंपनीच्या माध्यमातून पैसा गुंतविला आहे. लिजवर 35 एक्कर जागा घेतली ती एमआयडीसीकरिता देता आली असती. परंतु त्या जागेवर स्वत:चा फॉर्महाऊस बांधला. तेव्हा कुठे गेले शेतकरी प्रेम? आसेगाव सर्कल, कुन्हा सर्कलमध्ये पिकविम्याचे पैसे शेतकऱ्याला देवू शकले नाही. लाज वाटली पाहिजे’, असे तायडे म्हणाले होते. त्यामुळे आमदार कडू यांनी बदनामीकारण व खोटे वक्तव्य करून ते माध्यमाकडून प्रसिद्ध केल्यामुळे जनमानसात बदनामी झाल्याने भाजपचे प्रविण तायडे यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!