महाराष्ट्र

Assembly Election : प्रचाराच्या तोफा थंडावणार

Maharashtra Politics : केवळ फोन, भेटीगाठीवर जोर

Code Of Conduct : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा 18 नोव्हेंबर शेवटचा दिवस. मतदारसंघांतील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग सध्या उमेदवारांमध्ये आहे. आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार उमेदवारांना त्यांचा जाहीर प्रचार करता येणार नाही. मागील काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या प्रचाराच्या तोफा थंड होतील. मतदानापूर्वीचे 48 तास महत्त्वाचे असतात. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यासह सर्वच पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत. इतकंच नाहीतर इतर राज्यातील नेतेमंडळी, मुख्यमंत्रिदेखील या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होते. प्रचार आणि रोड-शोमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. कुठे तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले. प्रचाराचा शेवटचा दिवस असला, तरी जपसंपर्क सुरू राहणार आहे.

व्यापक बंदोबस्त

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे. नागपूर येथे तैनात चार हजारावर पोलिस कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केले आहे. विविध पोलिस ठाण्यांतील कर्मचारी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी केली. व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी शंभर टक्के मतदानाचा संकल्प केला आहे. या काळात मतदान केंद्रांवर पोलिस कर्मचाऱ्यांना आपली नावे शोधताना आणि उत्साहाने मतदान करताना पाहिले गेले.

Akola West : निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी घेतली माय-बहिणीची शपथ

डॉ. सिंघल यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील बूथवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेवरही लक्ष दिले जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्साह दिसून आला. त्यांनी मतदान प्रक्रियेबाबत सकारात्मकता दाखवली. मुख्य निवडणुकीसाठी पोलिस व्यवस्था पूर्णतः तयार आहे.

कडक आदेश

सोमवारी सायंकाळपासून मतदान पार पडेपर्यंत उमेदवारांना कोणताही प्रचार करता येणार नाही. जाहिरातबाजी करता येणार नाही. टीव्ही, केबल, रेडिओ, सोशल मीडिया, प्रसिद्धीपत्रक अशा कोणत्याही माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकता येणार नाही. छोटेखानी कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणूक यावरही बंदी असेल. त्यामुळे आता उमेदवारांची मदार छुप्या प्रचारावर अवलंबून असेल. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान दोन दिवसांवर आले आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रणाही सज्ज आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!