महाराष्ट्र

Akola : नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा, काँग्रेसची पोलिसांत तक्रार !

Congress : राणेंचे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण कारणीभूत

 Nitesh Rane : मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही पुन्हा नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अकोल्यात करण्यात आली आहे. काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

आक्रमक भाषण

धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केल्यामुळे नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा करावा, अशी मागणी अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी तक्रारीतून केली आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ 1 सप्टेंबर रोजी नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. नितेश राणे हे नगरला आले होते. त्यावेळी राणे यांचे आक्रमक भाषण झाले. दरम्यान राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याची फिर्याद देण्यात आली.

विधानाचे तीव्र पडसाद

राणे आणि मोर्चाचे संयोजक दिगंबर गेंट्याल यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पुन्हा नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. राणे यांचे विधान धार्मिक तेढ निर्माण करणारे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

नेमकी तक्रार काय?

काँग्रेसकडून शहर उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत, 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे सकल हिंदू समाजातर्फे महंत रामगीरी महाराज यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपप्रसंगी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केले असल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आला आहे.

Amol Mitkari : घाणीत लोळणाऱ्यांच्याच मेंदूत असे विचार येतील !

राणे बेजबाबदार

देशातील सामाजिक सौहार्द नष्ट होत आहे. धार्मिक तणाव निर्माण झाला असुन धार्मीक भावना दुखावल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा अपमानकारक वक्तव्यामुळे संपूर्ण भारत देशातील अबाधित एकतेला क्षति पोहचण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी नितेश राणेंचे बेजबाबदार आणि जातीवाचक वक्तव्य कारणीभुत आहे.

सदरहु भाषणादरम्यान नितेश राणे यांनी मी हिंदू धर्माचा गब्बर आहे, अशी खलनायकी भाषा वापरून तमाम हिंदू धर्माचासुध्दा अपमान केला आहे. त्यामुळे दोन्ही धर्मातील धार्मिक भावना दुखावून तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे नितेश राणे व मोर्चाचे संयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर कारवाई करण्यात यावी व तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!