महाराष्ट्र

Akola West : भाजपचा नेता एमआयएमच्या संपर्कात

Anything To Become MLA : साम, दाम, दंड, भेदची तयारी

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. विदर्भातील 25 जागांचा यात समावेश आहे. त्यातील 23 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना भारतीय जनता पार्टीने सावध भूमिका घेतली आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काय होते यासंदर्भात भाजप ‘वेट अँड वॉच’ करीत आहे. त्यामुळे या यादीमध्ये मोजक्याच नवीन लोकांना स्थान देण्यात आल्याचे दिसत आहे.

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. अकोला जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये मतभेद असल्याने त्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला नाही. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकी एक आहे. अकोला पश्चिममध्ये भाजपकडून अनेक दावेदार आहेत. यात दोन माजी महापौर, एक माजी नगराध्यक्ष, दोन माजी नगरसेवक आणि आणखी एका नेत्याचा समावेश आहे. अशात पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एक इच्छुक एमआयएमच्या संपर्कात आहे. भाजपा सोडून एमआयएममध्ये जाण्यासाठी संबंधित इच्छुक संपर्कात नसून आपल्या विजयासाठी या इच्छुकाने मोठी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.

साजिद खानची धास्ती 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस साजिद खान पठाण यांना उमेदवारी देणार हे निश्चित आहे. मात्र याच मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट सध्या अडून आहे. शिवसेनेला या मतदारसंघातून शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना संधी द्यायची आहे. मात्र काँग्रेस गेल्या निवडणुकीत साजिद खान पठाण यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी शिवसेनेला दाखवत आहे. केवळ अडीच हजार मतांनी भाजपचे गोवर्धन शर्मा हे साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अनेक नेते अकोला पश्चिमच्या जागेवर अडून बसले आहेत.

Bhandara : मनमर्जी कारभार; दिघोरी ग्रामपंचायतच्या सरपंच अपात्र

अशीच भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही घेण्यात आली आहे. काहीही झाले तरी अकोल्यातून राजेश मिश्रा यांना उमेदवारी द्यावी, असा शिवसेनेच्या नेत्यांचा आग्रह आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील आग्रही आहेत. अकोल्यातून स्वतः राजेश मिश्रा आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा अकोला पश्चिमच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. या सगळ्या धावपळीत आपल्या विषयाचे गणित फिक्स बसवण्यासाठी भाजपचा एक नेता एमआयएमच्या संपर्कात आहे.

असा आहे गेम 

विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आणि प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे साजिद खान पठाण हे उमेदवार असल्यास या नेत्याने ‘गेम’ करण्यासाठी ही ‘फिल्डिंग’ लावण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून आपल्याला आणि काँग्रेसकडून साजिद यांना उमेदवारी मिळाल्यास अकोला पश्चिममध्ये एमआयएमचा उमेदवार उभा करता येईल का, अशी चाचणी सध्या भाजपचा हा नेता करीत आहे. त्यासाठी या नेत्याने आपल्या जवळील कुबेराचा खजिना खुला करण्याची ऑफर दिली आहे.

काँग्रेसचे साजिद खान पठाण यांना मुस्लिम समाजातील तरुणांचे मतदान मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र अलीकडेच अकोल्यात झालेल्या दंगलीनंतर गैरमुस्लिम मत साजिद खान यांच्याकडे वळतील याबद्दल साशंकता आहे. अशात काँग्रेसच्या साजिद यांना त्यांच्याच समाजातील आणखी एका पक्षाने टक्कर दिली तर मतविभाजन नक्की होईल, असं या नेत्याचं गणित आहे. त्यामुळे प्रसंगी साम, दाम, दंड, भेद कोणतीही नीती वापरण्याची तयारी या नेत्याने ठेवली आहे. ‘मोहब्बत और जंग मे सब जायज हैं..’ अशी एक म्हण हिंदीत आहे आणि निवडणूक म्हणजे महायुद्ध असते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!