Agriculture News रविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीचा मोबदला आणि पिकविमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रविकांत तुपकरांमुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना पिकविमा व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून, रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे केलेले अन्नत्याग आंदोलन केले होते.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
त्यानंतर मुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी मान्य झाली होती. परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती.
त्यांनतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा व नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण अजूनही हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत त्यामुळे रविकांत तुपकरांनी 12 जून रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन पिकविम्याची मागणी लाऊन धरली व प्रधान सचिव (कृषि) यांच्याकडेही पाठपुरावा केला.
या पाठपुराव्या नंतर कृषिमंत्र्यांनी पिकविमा कंपनीला शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पिकविमा जमा करण्याचे कंपनीने मान्य केल्याने रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होणार आहे.
85 हजार 482 शेतकरी पिकविमा पासून वंचित
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, गेल्या खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीकडे जिल्ह्यातील 3 लाख 96 हजार 723 शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. त्यापैकी पात्र असलेले 85 हजार 482 शेतकरी पिकविमा पासून वंचित आहेत.
तर उंबरठा उत्पन्नाच्या आधारे पिकविम्यासाठी पात्र असलेले 93 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. नवीन खरीप हंगाम आला तरी मागील खरीप हंगामातील पिकविम्याची रक्कम अद्याप AIC पिकविमा कंपनीने जमा केली नाही. तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा करण्यास पिकविमा कंपनीला बाध्य करावे अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली होती.