महाराष्ट्र

Lok Sabha Election : तुपकरांच्या मदतीसाठी राजू शेट्टी धावून आले !

Buldhana Constituency : प्रचाराला लागण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निर्देश!

Buldhana Constituency : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रविकांत तुपकर हे आपले सहकारी असून, त्यांच्या प्रचारासाठी ‘स्वाभिमानी’चे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील सहकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहेत. त्यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र देखील दिले आहे. मागील 3 महिन्यांपासून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात बिनसल्याचे चित्र दिसून येत होते.मात्र, ऐन मदतीच्या काळात आता राजू शेट्टी यांनी उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या 22 वर्षांपासून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला व समाजातील सर्व घटकांसाठी अविरतपणे लढा देत आहेत. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शालेय जीवनापासूनच चळवळीत उडी घेतली होती. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात त्यांनी राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाखाली मोठे संघटन उभे केले. अनेक आंदोलनात राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लाऊन सहभाग घेत आंदोलने यशस्वी केले आहेत. मात्र मागील काही काळापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय मतभेद वाढीस लागले होते. संसद ते शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीनच रुंदावले होते. तर मागील काही महिन्यांपासून तुपकर आणि शेट्टीमधे कुठल्या तरी कारणामुळे बिनसले होते.त्यामुळे तुपकरांच्या आंदोलनातून शेट्टी आणि स्वाभिमानी पक्षाचा झेंडा गायब झाला होता. त्यानंतर बुलढाणा लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे स्वतंत्रपणे लढत आहेत. मात्र आता तुपकरांच्या उमेदवारीला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हातकणगंले, बुलढाणा, सांगली व परभणी या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवित आहेत, तरी राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या चार मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार प्रक्रियेत सहभागी व्हावे,अशी सूचनावजा विनंती या पत्रातून प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. आपण कोणाशीही आघाडी केलेली नसून आपले चारही उमेदवार स्वतंत्र आहेत,असेही या पत्रात नमुद आहे.

स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने यापूर्वीच तुपकरांना पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तर राजू शेट्टी यांनीदेखील तुपकरांना पाठिंबा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकदीने प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही शेतकरी संघटनांची ताकद एकत्रीतपणे तुपकरांच्या पाठिशी उभी राहिली आहे. तर दुसरीकडे विविध पक्षातील पदाधिकारीदेखील पक्षाचा राजीनामा देऊन उघडपणे रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला भिडले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात सर्वसामान्य नागरिक तुपकरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.

Lok Sabha Elections : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

गुरुत्व नाकारले, मात्र निष्ठा कायम होती ! 

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या निवडणुकीपूर्वीच्या एल्गार रथयात्रा, मंत्रालयाचा ताबा घेण्याचे आंदोलन वा मोर्चात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक वा राजू शेट्टी यांचा नामोल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली की काय? हा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः रविकांत तुपकर यांनीच दिले देऊन पूरक खुलासेही केले आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी ‘राजकीय फारकत’चा स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. मी आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते. तुपकरांनी शेट्टींचे गुरुत्व जरी नाकारले, तरी मात्र निष्ठा त्यांची कायम होती. त्यामुळे आज शेट्टी तुपकरांसाठी धावून आले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!