महाराष्ट्र

Buldhana News : दिसतील त्या ठिकाणी आमदारांना बदडून काढू !

Farmers Association : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इशारा; शिव जनस्वराज्य यात्रेला शेगावातून सुरुवात

कापूस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा यासह विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाले आहे. विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात 4 सप्टेंबरपासून श्री क्षेत्र नागझरी येथून शिव जनस्वराज्य यात्रा प्रारंभ झाली आहे. ही यात्रा 16 दिवसांमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील 191 गावांचा दौरा करणार आहे. शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे. शिवाय १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर दिसतील त्या ठिकाणी आमदारांना बदडून काढू, असा इशारा संघटनेने दिला आहे. 

20 सप्टेंबरनंतर सत्ताधारी पक्षांमधील आमदारांना राज्यात फिरू देणार नाही. शिवाय दिसेल त्या ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते बदडून काढतील, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट व युवकांच्या प्रश्नावर प्रशांत डिक्कर कायमच आक्रमक असतात. त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आवाहन केले आहे. शेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथून शिव जनस्वराज्य यात्रेला सुरुवात करीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली. ही जनस्वराज्य यात्रा 16 दिवसांत १९१ गावात जाणार आहे. कापूस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा यासह विविध मागण्यांसाठी ही यात्रा आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लाखो शेतकरी 20 सप्टेंबरला संग्रामपूर तहसील मैदानावर धडकणार आहेत. सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर 20 सप्टेंबरच्या संग्रामपूरच्या महामेळाव्यात सरकार विरोधात क्रांतीचा नवा संग्राम होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

20 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर नवा संग्राम पाहावयास मिळेल. यामध्ये सत्ताधारी पक्षांमधील आमदारांना राज्यात फिरू देणार नाही. शिवाय दिसेल त्या ठिकाणी स्वाभिनीचे कार्यकर्ते बदडून काढतील, असा गंभीर इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

Ravikant Tupkar : सिंदखेडराजातून पेटली शेतकऱ्यांच्या लढ्याची ज्योत

191 गावांमध्ये पोहोचणार यात्रा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता ॲक्शन मोडवर आली आहे. वर्षभर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारी ही संघटना पक्षाच्या रूपाने नशीब आजमावणार आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेले आहेत. दरम्यान कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना योग्य भाव, रखडलेल्या पीक विम्याची रक्कम तसेच शेतकरी, शेतमजूर आणि युवकांच्या विविध मागण्यांसाठी संघटना रस्त्यावर उतरली आहे.

16 दिवसांचा प्रवास

शेगाव तालुक्यातील नागझरी येथून संत गोमाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर यात्रेला प्रारंभ करण्यात आला. मतदार संघातील 191 गावांमध्ये 16 दिवसांत पोहोचण्याचा मानस प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेपूर्वी सरकारसोबत आरपारची लढाई होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्तेतील आमदारांना आता रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!