महाराष्ट्र

Gondia District : कर्जाला कंटाळून पती पत्नीची जलाशयात उडी घेत आत्महत्या

Gondia News : एकीकडे लोकशाहीचा उत्सव दुसरीकडे शेतकरी आत्महत्या

Gondia News : एकीकडे देश लोकशाहीचा उत्सव साजरा करीत असताना गोंदियात मात्र, कर्जाला कंटाळून पती पत्नीने जलाशयात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथे घड़ली आहे. विशेष म्हणजे आज लोकसभेच्या पहिल्या टप्यातील मतदान सुरु असताना त्याच दिवशी घटना घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Lok Sabha Election : विदर्भातील पाचही जागांवर “पंजा”..

तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील मुनेश्वर श्रीराम कुंभारे (वय 50) व पत्नी सरीता मुनेश्वर कुंभारे (वय 45) असे उडी घेणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. नेहमी प्रमाणे ते आज शेतात शेती कामानिमित्त गेले होते. दुपार झाली तरी मुनेश्वर कुंभारे पत्नीसह घरी न आल्याने मुलगी शेतात गेली तेव्हा आपल्या आई वडिलांचे मृतदेह जलाशायत तरंगताना दिसले. लागलीच तिने आरडाओरड करत गावकऱ्यांना जमा केले. लागलीच तिरोडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही मृतदेह जलाशयातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात हलवलेे आहे. तपास सुरु आहे.

दरम्यान मृतक दाम्पत्याला 10 वर्षाची प्रणाली ही एकुलती एक मुलगी असल्याने आई वडिलांच्या दुर्देवी मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकरी हिताचा गाजावाजा करणाऱ्या सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षांसाठी ही एक चपराक मानली जात आहे. शेतकरी आत्महत्येची प्रकरणे अजूनही थांबलेली नाहीत तर ती अधूनमधून विदर्भातील विविध जिल्ह्यात डोके वर काढतात हेच दिसून येते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!